Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ११ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

February 1, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Rajeev Niwatkar

मुक्तपीठ टीम

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत मदरसांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

            

मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता ९वी ते  १२वी तील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्याचा उद्देश या योजनेचा आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयांसाठी अनुदान आणि शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देखील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून दिले जाते.

            

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांकरिता लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना आणि अधिक तपशील महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेल्या आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या मदरसांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ यांच्याकडे ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव शासनास २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर केले जाणार आहेत.


Previous Post

“अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल” – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post

“मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी सर्व वर्गांची निराशा करणारं ‘अर्थ’हीन” : बाळासाहेब थोरात

Next Post
Balasahebh Thorat

"मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी सर्व वर्गांची निराशा करणारं ‘अर्थ’हीन" : बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!