Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार – राजेश टोपे

May 13, 2022
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
rajesh Tope

मुक्तपीठ टीम

 महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 यावेळी विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महात्मा जोतिराव फुले आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, संचालक डॉ. साधना तायडे, आदी उपस्थित होते.

टोपे म्हणाले, ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. ही योजना पूर्णपणे रुग्णकेंद्रीत करण्यासाठीचा प्रयत्न आहे.या योजनेत समावेश नसलेल्या उपचारांचा समावेश कशा पध्दतीने करता येईल यावर विचार केला जाईल.

धर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासाठी धर्मादाय कायद्यातील कलमात आवश्यक बदल करुन या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करु, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धर्मादाय दवाखान्यातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला जाईल, असे सांगितले. दिव्यांग नागरिकांना तालुका स्तरावर दाखले देण्यासाठी व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. तत्पूर्वी जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा होवून तज्ज्ञांनी आपली मते मांडली.


Tags: Health Minister Rajesh TopeJan Arogya Yojanapublic health departmentstate governmentYashwantrao Chavan Centerआरोग्यमंत्री राजेश टोपेजन आरोग्य योजनामहात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनामुक्तपीठयशवंतराव चव्हाण सेंटरराज्य शासनविधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरेसार्वजनिक आरोग्य विभाग
Previous Post

हेमंत ढोमेंचं पाण्यासाठी एक ट्वीट आणि मनपा, शिवसेना कामाला लागली! प्रश्न सुटलाही!!

Next Post

पनीर आवडतं? मात्र, सावधान, मुंबईत विकलं जातंय रोज हजारो किलो बनावट पनीर!!

Next Post
Paneer

पनीर आवडतं? मात्र, सावधान, मुंबईत विकलं जातंय रोज हजारो किलो बनावट पनीर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!