Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ व्हावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

February 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
Rajesh Tope's Appeal Towards Public Movement Against Tobacco Consumption

मुक्तपीठ टीम

तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभी राहणे गरजेचे असून याबाबतच्या कोटपा कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

            

सार्वजनिक आरोग्य विभाग, एनएचएम आणि टाटा मेमोरियल सेंटरच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्टेट लेव्हल यूथ टोबॅको सर्व्हेचे – महाराष्ट्र फॅक्ट शीटचे प्रकाशन राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

             

टाटा मेमोरियल सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला राजेश टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

            

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, शालेय विद्यार्थी तसेच महिला आणि मुलींमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढते आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे. याबाबत लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, कारण तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते. तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचेही श्री.टोपे यांनी सांगितले.

            

आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास म्हणाले, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत तरुणांमध्ये रंगपंचमीला धोकादायक रंगाचा वापर करु नये, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके वापरु नये, याबाबत मुलांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली गेली. त्यामुळे फटाके आणि रंगांचा वापर कमी झाला असल्याचे आढळून येते. त्याचप्रमाणे तंबाखूबाबत मुलांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

            

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ.पद्मजा जोगेवार, टाटा मेमोरियल सेंटरचे राजेंद्र बडवे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक संचालक डॉ. संजीवकुमार जाधव यांनी आभार मानले.


Tags: Rajesh TopeTata Memorial Hospitalटाटा मेमोरियल सेंटरराजेश टोपे
Previous Post

पैठणच्या ‘सिट्रस इस्टेट’ योजनेसाठी १३ कोटीच्या खर्चास मान्यता

Next Post

अहमदाबादच्या साखळी स्फोटांमधील ३८ दोषींना फाशी! मोठा निकाल, पण अॅड. उज्ज्वल निकमांचा काय इशारा?

Next Post
Adv Ujjwal nikam alert on Ahmedabad bomb blast death punishment

अहमदाबादच्या साखळी स्फोटांमधील ३८ दोषींना फाशी! मोठा निकाल, पण अॅड. उज्ज्वल निकमांचा काय इशारा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!