मुक्तपीठ टीम
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबादचं संभाजीनगरच्या नामांतरावरून शिवसेना-भाजपा-मनसे वाद रंगला आहे. दरम्यान आता नामांतराचा मुद्दा पेटलेला असताना राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर असं, बोलायला आवडत असेल पण सध्या नामांतराचा विषय हा सरकारच्या अजेंड्यावर नाही, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले. त्यामुळे आता शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले राजेश टोपे?
- औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही.
- हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात.
- माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही.
- हा सरकारच्या अजेंड्यावर विषय नाही, आमच्या पक्षाच्या तर आजिबातच नाही.
- मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो, असं ते म्हणाले.
सोयीप्रमाणं लोक संभाजीनगर म्हणतात!
- राजेश टोपे पुढे म्हणाले की, सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर म्हणतात
- पण मला वाटत नाही की हा विषय सरकारच्या अजेंड्यावरचा आहे.
- आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत.
- पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि अन्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण लक्ष देऊ.