Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिघेसाहेब, आपल्या ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसला! या गद्दारांचं काय करायचं? खा. राजन विचारेंचं पत्र व्हायरल…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajan vichare emotional letter to anand dighe

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार-खासदार ठाकरेंकडून शिंदेंकडे गेले, जात आहेत. त्याचवेळी शिवसेनेशी निष्ठा कायम राखणाऱ्यांमधील एक असणाऱ्या ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचे एक भाविनक पत्र सध्या व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजन विचारे यांनी शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांना पत्र लिहित भावनिक साद घातली आहे.

राजन विचारे यांनी दिवंगत आनंद दिघे यांना खुले पत्र लिहित आपल्या मनातील विचार मांडले आहे. ट्विटरवर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. पत्रासोबत त्यांनी ‘घात झालाय दिघे साहेब, कुठल्या तोंडाने सांगू, ह्यांना कसं माफ करायचं?’ अशा अशायाची कमेंट देखील केली आहे. तसेच शिवसेना खासदार राजन विचारे यांचं दिवंगत नेते आनंद दिघें यांना भावूक पत्र असे म्हटले आहे.

‘घात झालाय दिघे साहेब, कुठल्या तोंडाने सांगू, ह्यांना कसं माफ करायचं?’

शिवसेना खासदार राजन विचारे यांचं दिवंगत नेते आनंद दिघें यांना भावूक पत्र@rajanvichare #AnandDighe @KedarDighe1 @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT pic.twitter.com/avyDxAlUQQ

— Akshay Adhav | अक्षय आढाव (@Adhav_Akshay1) July 31, 2022

राजन विचारे यांचे पत्र जसं आहे तसं…

पत्रास कारण की…
प्रति,
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांस….

जय महाराष्ट्र साहेब…

साहेब आज तुम्हाला जाऊन २१ वर्षे उलटली..असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही
पण आज तुमची जरा जास्तच आठवण येतेय साहेब…

वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो..ह्या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत… अजूनही आहात ..अंधारात वाट दाखवत… धगधगत्या दिव्यासारखे

पण साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे .. तितका कधीच नव्हतो. कारण आज एक अशी घटना घडलीये
ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही, फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्व सामान्य मराठी माणूस सुध्दा अस्वस्थ झालाय….
आता तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगू, घात झालाय दिघे साहेब… , तो पण आपल्याच लोकांकडून
म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब

शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब….
तेव्हा तुमची ५६ इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही
साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता..
महाराष्ट्रात ज्या ठाण्याने आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय
छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब… ह्या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गदारांना क्षमा नाही..हे तुम्हीच बोलला होता ना साहेब.

आणि आज हे दुस-यांदा झालय…पण तुम्ही नाही आहात. ह्यांना कसं माफ करायचं,
तुम्ही असता तर काय केलं असतं, म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब
साहेब आज आनंदश्रमाकडे पाहिलं अन् चटकन डोळ्यात पाणी आलं
ह्याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं ना तुम्ही साहेब

आज तेच बंधन तुटताना होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायेत- पण रडायचं नाही लढायचं.
हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली …
साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला –
म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब …
पण साहेब काळजी नसावी …

कोणत्याही पदापेक्षा.. वैयक्तिक स्वायपिक्षा संघटना महत्वाची ..पक्ष महत्वाचा..
तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन आणि तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी…
कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्या सोबत ..
साहेब आम्ही जीवाची बाजी लावू पण शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना.. हे ब्रीदवाक्य पुसू देणार नाही आम्ही…

पुन्हा एकदा तुमचा सैनिक ह्या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे..
कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे आमच्या .
पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी ह्या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असु द्या …
आणि पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा…..!

तुमचा सच्चा शिवसैनिक
– राजन विचारे


Tags: Anand DigheEknath ShindeRajan VicharethaneUddhav Thackerayआनंद दिघेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेठाणेराजन विचारेशिवसेना
Previous Post

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

Next Post

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!