Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाणे-डोंबिवलीतील काय ते रस्ते, काय ते खड्डे…काहीच नाही ओक्के! शिवसेना-भाजपाकडून मुख्यमंत्री शिंदे लक्ष्य!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rajan Vichare And Ravindra Chavan Target Cm Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आणि ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता या खड्ड्यांवरून शिवसेनेनेच नाही तर युतीमित्र भाजपाकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे.

सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्यां मुख्यमंत्र्यांना ठाण्यातील खड्डे दिसत नाही का? राजन विचारें

  • ठाणे शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकर नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
  • मुंबईतून ठाण्यात प्रवेश करताच वाहन चालकांना ठाण्यातील खड्ड्यांना आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांकडून नाराजीचे वातावरण आहे.
  • आता मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच आपल्या ठाण्यातील निवासस्थानी येत असतात.
  • एकीकडे मुख्यमंत्री सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, असं सांगितलं जातं.
  • मग, सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी विचारला आहे.
  • ठाण्यातील कोपरी येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.
  • या दौऱ्यादरम्यान विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका, भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट मुख्यमंत्र्यांवर टीका!

  • राज्यात भाजपाची सत्ता असताना डोंबिवली शहरासाठी ४७२ कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या.
  • मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकारमधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली.
  • कोणाला ते माहित आहे.
  • पण वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला होता.
  • ज्यांनी कोणी निधी रद्द केला होता आता हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
  • पहिल्यांदा खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत.
  • प्रस्ताव पुन्हा सादर करा, असं लिहिलं.
  • पण त्यालाही एक महिना झालाय.
  • यामुळेच त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका, असा टोला भाजपाचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Tags: dombivaliEknath ShindeRajan VichareRavindra Chavanthaneएकनाथ शिंदेठाणेडोंबिवलीरवींद्र चव्हाणरस्तेराजन विचारे
Previous Post

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई- सचिन्द्र प्रताप सिंह

Next Post

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारण्यासंदर्भात चर्चा- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post
Sudhir Mungantiwar

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारण्यासंदर्भात चर्चा- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!