Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंची फटकेबाजी: “लॉकडाऊन आवडे सरकारला…” पासून “चंद्रकांतदादांना क्लिप मिळाली कशी?”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी गाठली. यानिमित्तानं पुण्यात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेटही घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. त्याचवेळी त्यांनी लॉकडाऊनवरून राज्यसरकारला आणि न पाठवताच चंद्रकांत पाटलांना मिळालेल्या क्लिपवरून भाजपालाही टोले मारले.

 

“ज्यांना जातीवरुन मतदान हवं आहे, त्यांनी केलेल्या या गोष्टी आहेत.

  • “बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही.
  • त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं.
  • त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत.
  • मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे.
  • त्यांनी त्यांच्या लिखाणातून फक्त सत्य मांडलं आहे.
  • त्यांनी कधीही इतिहासाला धक्का लावलेला नाही.
  • त्यांनी दंतकथा सांगितल्या नाहीत. जेव्हा दंतकथा असतील, त्यावेळी ते तसा उल्लेख करत होते की या दंतकथा आहेत.
  • त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये कधीच दंतकथांचा शिरकाव होऊ दिला नाही.
  • त्यांच्या कोणत्याही शिवचरित्रामध्ये तुम्हाला कधीच घोरपडीचा किस्सा दिसणार नाही.
  • दंतकथा या ऐकायला छान असतात, पण त्यांचा इतिहासाशी काही संबंध नसतो.
  • ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांनी स्वतः काही वाचायचं नाही आणि अशा गोष्टी पसरवायच्या, जातीभेद पसरवून आपली पोटं भरायची.
  • त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं.”

purandare

मी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवली नाही!

  • “मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवलेली नाही.
  • मी त्यांना बोललो होतो क्लिप पाठवीन पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली मला कल्पना नाही.
  • मी जे असतं तेच बलतो.
  • मी त्यांना विचारणार आहे की, क्लिप कोणी पाठवली.
  • त्यादिवशी ते नाशिकला मला ज्यावेळी भेटले, त्यावेळी इतर विषयांसोबत हा देखील एक विषय निघाला.
  • त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, मुळात माझं ते भाषण हिंदीतून होतं.
  • ते त्यांना कळालं, तुम्हाला अजून नाही कळलं.
  • तुम्हाला जर अजून कळलं नसेल, तर मी काय बोललो हे पाठवून देईन.
  • त्यावेळी तेही म्हणाले की, नक्की पाठव मला ऐकायला आवडेल.”
  • त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो.
  • त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.

 

बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही!

  • राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेशी युतीबाबत विचार करू असं म्हणाले आहेत.
  • त्याबाबत राज यांना विचारण्यात आलं. त्यावर,भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत.
  • माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत.
  • बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. मी तसा विचार करत नाही.
  • आजपर्यंत मी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत.
  • त्या देशहिताच्या आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत.
  • त्यामध्ये प्रत्येक राज्यानी आपापली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे?
  • तुम्ही आमच्यावर आक्रमण करु नका, आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाही.
  • आसाम आणि मिझोरममध्ये जर पाहिलं, तर तिकडेही तेच सुरु आहे.

 

‘लॉकडाऊन आवडे सरकारला’

  • तिसरी लाट येणार म्हणून आपण आतापासूनच घाबरून घरामध्ये बसायचं ही कुठली पद्धत आहे.
  • लोकांचे उद्योगधंदे बरबाद झाले आहेत.
  • लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
  • घरं कशी चालवायची कळत नाही, मुलांच्या फी कशा भरायच्या तेही समजत नाही.
  • यांना काय जातं लॉकडाऊन करायचा आणि यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत.
  • पी. साईनाथ यांचं पुस्तक होतं. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ तसं हे ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’, असा टोला राज यांनी लगावला.

Tags: BJPRaj Thackerayचंद्रकांत पाटीलबाबासाहेब पुरंदरेभाजपाराज ठाकरे
Previous Post

“आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा राज्य शासनाचा बहुमानच”

Next Post

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस

Next Post
amazon - flipkart

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!