मुक्तपीठ टीम
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी गाठली. यानिमित्तानं पुण्यात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेटही घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. त्याचवेळी त्यांनी लॉकडाऊनवरून राज्यसरकारला आणि न पाठवताच चंद्रकांत पाटलांना मिळालेल्या क्लिपवरून भाजपालाही टोले मारले.
“ज्यांना जातीवरुन मतदान हवं आहे, त्यांनी केलेल्या या गोष्टी आहेत.
- “बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही.
- त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं.
- त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत.
- मी लहानपणापासून बाबासाहेबांची व्याख्याने ऐकत आलो आहे.
- त्यांनी त्यांच्या लिखाणातून फक्त सत्य मांडलं आहे.
- त्यांनी कधीही इतिहासाला धक्का लावलेला नाही.
- त्यांनी दंतकथा सांगितल्या नाहीत. जेव्हा दंतकथा असतील, त्यावेळी ते तसा उल्लेख करत होते की या दंतकथा आहेत.
- त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये कधीच दंतकथांचा शिरकाव होऊ दिला नाही.
- त्यांच्या कोणत्याही शिवचरित्रामध्ये तुम्हाला कधीच घोरपडीचा किस्सा दिसणार नाही.
- दंतकथा या ऐकायला छान असतात, पण त्यांचा इतिहासाशी काही संबंध नसतो.
- ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांनी स्वतः काही वाचायचं नाही आणि अशा गोष्टी पसरवायच्या, जातीभेद पसरवून आपली पोटं भरायची.
- त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं.”
मी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवली नाही!
- “मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवलेली नाही.
- मी त्यांना बोललो होतो क्लिप पाठवीन पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली मला कल्पना नाही.
- मी जे असतं तेच बलतो.
- मी त्यांना विचारणार आहे की, क्लिप कोणी पाठवली.
- त्यादिवशी ते नाशिकला मला ज्यावेळी भेटले, त्यावेळी इतर विषयांसोबत हा देखील एक विषय निघाला.
- त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, मुळात माझं ते भाषण हिंदीतून होतं.
- ते त्यांना कळालं, तुम्हाला अजून नाही कळलं.
- तुम्हाला जर अजून कळलं नसेल, तर मी काय बोललो हे पाठवून देईन.
- त्यावेळी तेही म्हणाले की, नक्की पाठव मला ऐकायला आवडेल.”
- त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो.
- त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.
बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही!
- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेशी युतीबाबत विचार करू असं म्हणाले आहेत.
- त्याबाबत राज यांना विचारण्यात आलं. त्यावर,भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत.
- माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत.
- बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. मी तसा विचार करत नाही.
- आजपर्यंत मी स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत.
- त्या देशहिताच्या आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत.
- त्यामध्ये प्रत्येक राज्यानी आपापली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि त्यासाठी काय काय केलं पाहिजे?
- तुम्ही आमच्यावर आक्रमण करु नका, आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाही.
- आसाम आणि मिझोरममध्ये जर पाहिलं, तर तिकडेही तेच सुरु आहे.
‘लॉकडाऊन आवडे सरकारला’
- तिसरी लाट येणार म्हणून आपण आतापासूनच घाबरून घरामध्ये बसायचं ही कुठली पद्धत आहे.
- लोकांचे उद्योगधंदे बरबाद झाले आहेत.
- लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
- घरं कशी चालवायची कळत नाही, मुलांच्या फी कशा भरायच्या तेही समजत नाही.
- यांना काय जातं लॉकडाऊन करायचा आणि यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत.
- पी. साईनाथ यांचं पुस्तक होतं. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ तसं हे ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’, असा टोला राज यांनी लगावला.