Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या उत्तर सभेत राष्ट्रवादी आणि पवारच मुख्य लक्ष्य!

शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याकडेही दाखवले बोट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray vs NCP

मुक्तपीठ टीम

गुढीपाडव्याच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्यानंतर मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत संजय राऊतांवर टीका केली असली तरी मुख्य लक्ष्य हे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होते. त्यातही शरद पवारांवर जातीयवादाच्या आरोपांचा पुनरुच्चार करताना त्यांनी एक वेगळाच आरोप केला. शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केलाय.

 

शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप!

  • गुढी पाडवा मेळाव्यानंतर ठाणे उत्तरसभेतही राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप केला.
  • जातीयवाद जो आला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून.
  • महाराष्ट्रात जात होतीच, हजारो वर्षापासून जात आहे.
  • पण तेव्हा प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा १९९९मध्ये जेव्हा जन्म झाला, तेव्हापासून दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला गेला.
  • मराठी मुलांची माथी भडकावली गेली.
  • इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे…राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड अशा संघटना काढल्या आहेत.
  • त्या संघटना १९९९नंतरच कशा आल्या? हा योगायोग नाही. त्या यांनीच काढल्या.

 

पवारसाहेब भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही!

  • ‘पुण्यात मुलाखत घेताना मी शरद पवारांना प्रश्न विचारला होता, ती आजही काढून बघा.
  • त्याचं वय पाहता मी तेव्हा जास्त खोलात गेलो नाही.
  • पण राष्ट्रवादीच्या जन्मापासून शरद पवार ज्या ज्या वेळी भाषण करतात तेव्हा म्हणत की शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र…हे मान्यच आहे.
  • पण त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
  • पण पवारसाहेब कधीही कुठल्याही सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना दिसणार नाहीत.
  • कारण छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुस्लिम मतं गेली तर काय करायचं? आणि मग छत्रपतींवर राजकारण करायचं असेल, जातीवर राजकारण करायचं असेल, माझ्या  तरुणांची, बंधु-भगिनींची माथी भडकवायची असतील तर मग दुसरं कुणीतरी पुस्तकं लिहिलं, ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिली, मग अजून कुणीतरी काहीतरी लिहिलं.

 

FakeकीFact? शरद पवार भाषणात खरंच शिवाजी महाराजांचा उल्लेख मुस्लिमांसाठी टाळतात?

 

 


Tags: ajit pawarmnsNCPRaj Thackeraysharad pawarsupriya suleअजित पवारउत्तरसभामनसेराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

उत्पादन पद्धत पडताळणीसाठी FDAद्वारे औषध कंपन्यांची तपासणी

Next Post

FakeकीFact? शरद पवार भाषणात खरंच शिवाजी महाराजांचा उल्लेख मुस्लिमांसाठी टाळतात?

Next Post
Raj thackeray And sharad pawar

FakeकीFact? शरद पवार भाषणात खरंच शिवाजी महाराजांचा उल्लेख मुस्लिमांसाठी टाळतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!