Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वैज्ञानिक संशोधन प्रकाशनात भारताची जागतिक कामगिरी उंचावली

January 23, 2021
in सरकारी बातम्या
0
LAB

मुक्तपीठ टीम

 

विज्ञान क्षेत्रातले भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी आता नवोन्मेशी अर्थव्यवस्थेशी जोडली जाऊ लागली आहे. वैज्ञानिक संशोधनविषयक प्रकाशनात देशाने तिसरे स्थान प्राप्त केले आहे, आता जागतिक नवोन्मेश निर्देशांकानुसार जागतिक स्तरावरच्या नवोन्मेशी अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या ५० मधेही भारताने स्थान प्राप्त केले आहे. अनेक विकसित आणि विकसनशील देशानाही भारताने मागे टाकले आहे.

 

संशोधन आणि विकास क्षेत्रात भारताच्या राष्ट्रीय गुंतवणुकीत २०१७-१८ मधल्या १,१३,८२५.०३ कोटी रुपयांवरून वाढ होऊन २०१८-१९ मध्ये ती १,२३,८४७.७१ कोटी रुपये झाली. त्याच बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या निधी सारख्या उपक्रमांनीही हे स्थान प्राप्त करण्यात महत्वाची भूमिका बजावली. निधीच्या अंमलबजावणीमुळे ३६८१ स्टार्ट अपची जोपासना झाली यातून १९९२ बौद्धिक संपदेची निर्मिती झाली. या माध्यमातून गेल्या पाच वर्षात थेट रोजगाराच्या स्वरुपात ६५,८६४ रोजगाराची आणि २७,२६२  कोटी रुपयांच्या आर्थिक संपदेची निर्मिती झाली.

 

कल्पनांचे वापरायोग्य तंत्रज्ञानात रुपांतर आणि त्याचा देशभरात मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याच्या चळवळीचा देशभर प्रसार सुरु झाला आहे. २०१७-१८ या वर्षात  १३,०४५ पेटंटना मंजुरी देण्यात आली त्यात १,९३७ भारतीय पेटंटचा समावेश होता. २०१७-१८ या वर्षात भारतीय पेटंट कार्यालयात दाखल झालेल्या पेटंट मध्ये काही राज्यांचा सिंहाचा वाटा होता.  दाखल ६५% पेटंट महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांमधली होती.

 

गेल्या १० वर्षात विज्ञान संशोधनविषयक प्रकाशनात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या एजन्सीच्या आकडेवारी नुसार भारताचे नॅशनल सायन्स फौंडेशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये १,३५,७८८ वैज्ञानिक लेख प्रकाशित करण्यात आले. वैज्ञानिक प्रकाशनात भारतात १२.९  वाढ झाली आहे तर जागतिक सरासरी ४.९ आहे. भारतात २००८ ते २०१८ या काळात प्रकाशन वार्षिक वृद्धी दर १०.७३ टक्के असा सर्वात वेगवान दर राहिला.


Tags: AmericaIndiaNational Science FoundationResearch and developmentScientific researchअमेरिकानॅशनल सायन्स फौंडेशनभारतवैज्ञानिक संशोधनसंशोधन आणि विकास क्षेत्र
Previous Post

१७ लाख प्रवाशी! बनावट ओळखपत्रांनी प्रवास…रेल्वेने दाखल केला गुन्हा!

Next Post

महाराष्ट्रात एक आपलसं करणारा आरोग्य प्रयोग…आपला दवाखाना!

Next Post
one rupee clinic

महाराष्ट्रात एक आपलसं करणारा आरोग्य प्रयोग...आपला दवाखाना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!