मुक्तपीठ टीम
येत्या १५ फेब्रुवारी २२ रोजी सुरु होणारी रेल्वे भरतीची दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) आणि सीईएन आरआरसी ०१/ २०१९ ची येत्या २३ फेब्रुवारी रोजी सुरु होणारी पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (सीबीटी ) पुढे ढकलण्यात आली आहे.
सीईएन ०१ / २०१९ च्या (एनटीपीसी ) पार्श्वभूमीवर रेल्वे भरती मंडळाने १४-१५ जानेवारी २२ रोजी जारी केलेल्या “नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज” च्या (केंद्रीय रोजगार अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीच्या (सीबीटी ) निकालासंदर्भात उमेदवारांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.
ही समिती उमेदवारांनी उपस्थित केलेले खालील मुद्दे विचारात घेऊन शिफारशी करणार आहे. सीईएन ०1/२०१९ (एनटीपीसी )च्या पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीचे निकाल आणि निवडलेल्या उमेदवारांना प्रभावित न करता विद्यमान यादीतील दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी -सीबीटीसाठी उमेदवार निवडण्यासाठी वापरलेली पद्धत आणि सीईएन आरआरसी ०१/२०१९ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीचा समावेश उमेदवार त्यांच्या शंका आणि सूचना समितीकडे पुढील ईमेल आयडीवर नोंदवू शकतात:
रेल्वे भरती मंडळाच्या सर्व अध्यक्षांना त्यांच्या विद्यमान स्रोतांकडून उमेदवारांच्या तक्रारी प्राप्त करण्याचे आणि त्या संकलित करून समितीकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांना त्यांच्या शंका आणि सूचना सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वेळ दिला आहे आणि या समस्या जाणून घेतल्यानंतर समिती ०४ मार्च २२ पर्यंत त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे .