Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे मुंबईतील परळ, महालक्ष्मी मैदानं खासगी बिल्डरना लीजवर देणार!

देशभरातील ९२ मैदानं यादीत, ९९ वर्षांच्या कराराने लीजवर देऊन कमर्शियल कॉम्प्लेक्स

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
railway

मुक्तपीठ टीम

देशभरात रेल्वेकडे लाखो एकरचे भूखंड रिकामे आहेत. रेल्वेमार्गाशेजारीलही रेल्वेची बरीच जमीन आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने रेल्वेची ही रिकामी जागा विकासकांना लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे ९२ भूखंड विकासकांना लीजवर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यापैकी १५ मैदानांच्या प्रस्तावित वापराच्या तांत्रिक अभ्यासासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मॉल किंवा अन्य व्यावसायिक बांधकाम होणार असलेल्या या भूखंडांपैकी दोन मुंबईतील आहेत. एक परळचे रेल्वे मैदान तर दुसरा महालक्ष्मीचे रेल्वे क्रीडा संकुल हे पहिल्या टप्प्यातील भूखंडाच्या यादीत आहेत.

नेमकी काय आहे योजना?

  • रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने वाराणसी येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, परळ येथे क्रिकेट मैदान, भुवनेश्वर येथील स्टेडियम, पाटणा येथील इंडोर स्टेडियम, कोलकाता येथे स्टेडियम, चेन्नई येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, रायबरेली येथील क्रीडा कॉम्प्लेक्स, गुवाहाटीमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मलिगाव येथे कपूरथळा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून विकसित करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
  • यासह, तांत्रिक-आर्थिक अभ्यासासाठी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने निवडलेल्या ठिकाणांमध्ये सिकंदराबादमधील बंगळुरुमधील क्रिकेट स्टेडियम, महालक्ष्मीमधील क्रीडा संकुल, रांचीमधील हॉकी स्टेडियम, लखनौमधील क्रिकेट, स्टेडियम व गोरखपूर स्टेडियम इत्यादींचा समावेश आहे.

 

गोरखपूरमधील रेल्वेच्या रिकाम्या जमीनीवर मॉल-

  • यापूर्वी अशी बातमी आली होती की भारतीय रेल्वे गोरखपूरच्या असुरन चौक आणि दुर्गाबारी येथील रेल्वे ज्युनियर इन्स्टिट्यूट परिसरात शॉपिंग मॉल आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स तयार करण्याची तयारी करत आहे.
  • गोरखपूरच्या दोन्ही प्रमुख ठिकाणी जमीन निवडली गेली आहे.
  • रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाला पाठविलेल्या प्रस्तावानुसार दोन्ही जागा खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात येतील.

 

लखनौमध्ये टाउनशिपही बांधली जाणार-

  • रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने ऐशबाग येथील लखनौ इंडस्ट्रियल साइडिंगची जमीन ९९ वर्षांच्या लीजवर खासगी बिल्डरला दिली आहे.
  • एलआयएसकडे मवैया-तळकटोरा रस्त्यावरील मवैया पुलावरून खाली उतरत असलेल्या उजव्या बाजूला सुमारे ३.५४ हेक्टर जमीन आहे.
  • या जागेवर सिमेंट आणि गिट्टी विक्रेते व्यापलेले होते.

 

मुझफ्फरपूरमध्ये मॉल बांधले जाणार-

  • रेल्वेने बिहारच्या मुझफ्फरपूरच्या इमलीखट्टी येथे रिकाम्या जागेवर मॉल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कोलकातास्थित एका कंपनीला आरएलडीएच्या जमिनीवर मॉल बांधण्याचे काम देण्याची तयारी सुरू झाली आहे.
  • कंपनीने यासाठी सर्वेक्षणही केले आहे.
  • याशिवाय लोको कॉलनीतील रिक्त जागा व्यावसायिक वापरासाठी निर्णय रेल्वेने घेतला आहे.

Tags: landpvt buildersrailwayकमर्शियल कॉम्प्लेक्सजमीनरेल्वे
Previous Post

टीव्ही नियमांमध्ये सुधारणा, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी कायदेशीर यंत्रणा

Next Post

अनवाणी धावूनही जग गाजवलं…शत्रूनंही गौरवलं…फ्लाईंग शिख!

Next Post
अनवाणी धावूनही जग गाजवलं…शत्रूनंही गौरवलं…फ्लाईंग शिख!

अनवाणी धावूनही जग गाजवलं...शत्रूनंही गौरवलं...फ्लाईंग शिख!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!