मुक्तपीठ टीम
कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज ८५ वा दिवस आहे. शेतकरी संघटना आज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून आज दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल्वे रोको आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, बिहार ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांना रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला असून, रेल्वे वाहतूक रोखण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने चार स्टेशन्स बंद केले आहेत. याशिवाय दिल्लीतील नांगलोई रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
रेवाडीच्या दिल्ली जयपूर रेल्वे मार्गावर हरियाणा, राजस्थान सीमेवरील अजर का जंक्शनजवळ देखील शेतकऱ्यांनी ठिय्या दिला आहे. पंजाबमध्ये किसान मजदूर संघर्ष कमिटीने रेल रोको आंदोलन करत अमृतसरमधील रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. तर बिहारमधील पाटणा येथे रेले रोको करण्यात आले असून, पप्पू यादव यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बिहारमध्ये जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पटणा जंक्शन रेल्वे स्टेशनवर रेले रोको आंदोलन केलं. जम्मू-काशामीरमध्ये देखी विविध ठिकाणी रेल रोको आंदोलन केले जात आहे.
रेल्वेने २० हजार अतिरिक्त जवान केले तैनात
शेतकर्यांनी रेल्वे थांबवण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) २० अतिरिक्त कंपन्या म्हणजेच २० हजार अतिरिक्त जवान देशभरात तैनात केले आहेत. त्यापैकी बहुतेकांना पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहे. रेल्वे संरक्षण दलाचे डीजी अरुण कुमार यांनी निदर्शकांनी शांततेत निदर्शने करण्याचे आवाहन केले असून ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये.