अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
पोलादपूर तालुक्यात आडवळे खुर्द गावचा जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बाजूचा बांध तुटला. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरु होती. ती रोखण्यासाठी गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी श्रमदानाने मातीचा व दगडाचा बांध तयार केला. त्यामुळे बंधाऱ्यातून होणारी गळती थांबल्याने पाणी वाया जाणे बंद झाले.
यासाठी युवराज भोईटे, शांताराम भोईटे, निवृत्ती भोईटे, तुकाराम भोईटे, विठोबा भोईटे, किशोर घाडगे, विश्वास करंजे, ज्ञानदेव घाडगे, किशोर घाडगे,सुदेश बाळकृष्ण भोईटे, गणेश कंक, अमित घाडगे, विश्वाबंर घाडगे, अक्षय विश्वास करंजे, ज्ञानदेव तुकाराम घाडगे, निवृत्ती महादेव घाडगे, रामचंद्र मालुसरे, मारूती मालुसरे, शशिकांत उतेकर, तुकाराम भोईटे, युवराज दगडू भोईटे, शिवाजी दगडू भोईटे, गणेश घाडगे, यांनी पुढाकार घेतला. या गावकऱ्यांच्या कामगिरीचे चौफेर कौतुक केले जात आहे.
लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ: