मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नेते राहुल गांधी थेट ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल झाले. मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर संसदेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी सकाळी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टर चालवत आल्याचे दिसले. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, दीपेंद्र हुड्डा यांच्यासह इतर नेते होते. यावेळी रणदीप सुरजेवाला आणि बी.व्ही श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले.
संसदेसाठी शेतकऱ्यांचा निरोप
- राहुल गांधी म्हणाले की, मी संसदेसाठी शेतकऱ्यांचा निरोप आणला आहे.
- मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे.
- संसदेत कृषी कायद्यांवर चर्चाच होऊ दिली जात नाही.
- शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करायलाच हवेत.
- संपूर्ण देशाला माहित आहे की, हे कायदे शेतकरी हिताचे नव्हे तर २-३ बड्या उद्योजकांच्या हिताचे आहेत.