मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने आता मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र सोडण्यापूर्वी राहुल गांधी यांनी बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथून महाराष्ट्रातील जनतेला संदेश देणारं एक पत्र लिहिलं.
राहुल गांधींचं पत्र जसं आहे तसं…
दि. २२ नोव्हेंबर २०२२, संध्याकाळी ५.०० वाजता महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन सुरु झाला आणि शिवाजींचा मातृ जिल्हा, (जिजाऊ मांसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेश मध्ये जात आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संताच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत.
महाराष्ट्रातील जनतेने या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिले. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येने नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व अबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे ह्रदय, मन भरून आले आहे.
महाराष्ट्रात आम्हाला भारतातील समृद्ध विविधतेचे दर्शन झाले.या यात्रेदरम्यान, आम्हाला अनेक ऐतिहासिक मंदिरांना गुरुद्वारांना भेटी देता आल्या तसेच विठ्ठलाचे पाईक वारकरी, बौद्ध भिक्कू आणि सुफी संप्रदायातील लोक यांच्यासोबत चालताना मनस्वी आनंद झाला. आम्ही भगवान बिरसा मुंडा यांची १५७ वी जयंती देशातील इतर आदिवासी बांधवांप्रमाणे साजरी केली. प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी महिला शक्तींना घेऊन (शक्तीमार्च) महिला सन्मानाचा संदेश दिला तसेच या प्रसंगी हजारो आदिवासी महिलांशी संवाद साधता आला व १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात परंतु त्यांच्या तपस्यांचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमिमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली प्रचंड भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलेले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हतोत्साहीत झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले. आदिवासी समुदाय हा या देशाचा मुलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. वन हक्क जमीन २००६ चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुटवला जात आहे हे सुद्धा लक्षात आले. या सगळ्या समस्यांची कारणमिमांसा करताना असे लक्षात आले की, भाजपाचे काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती सिमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नितीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.
महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहू, फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे आणि हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकवण्याचा प्रयत्न अनेक नागरी समुदाय, पुरोगामी विचारांचे कलाकार, साहित्यिक, सिने क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र हे करत आहेत आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहिन.
या प्रवासात वृत्तवाहिन्या व प्रिंट माध्यमातील माध्यम कर्मींच्या सहभागाकरीता मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.
आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत. आपण दिलेले प्रेम, प्रचंड मोठा असा प्रतिसाद आणि आपण केलेले आदरातिथ्य याने आम्हाला एक नवीन ऊर्जा दिली आहे.
धन्यवाद!
खा. राहुल गांधी.
Message from Shri Rahul Gandhi, MP, to the people of Maharashtra from Jalgaon Jamod, Buldhana district.
The Bharat Jodo Yatra entered Maharashtra paying tribute to Chattrapati Shivaji Maharaj, and we leave today from Buldhana district, where his mother Rajmata Jijabai was born. It is our privilege to take inspiration from them, as well as the great social reformers and sants of Maharashtra – Shahuji Maharaj, Jotiba and Savitriba Phule, Ahilyabai Holkar, Babasaheb Ambedkar, Shirdi Sai Baba, Gajanan Maharaj and many others. For centuries, these great men and women have spread the message of equality, fraternity and social justice. This is the message of the Constitution drafted by Babasaheb Ambedkar, as well as of the Bharat Jodo Yatra, and we are humbled to be walking in their footsteps.
We are very grateful for the overwhelming response of the people of Maharashtra – from the large crowds who walked with us every morning despite the cold, to the lakhs who attended our public rallies in Nanded and Shegaon. Large numbers of women and youth joined us, which was especially heartening.
In Maharashtra, we witnessed and celebrated India’s rich diversity. We visited historical temples and gurudwaras, and walked with Warkaris, Bhikhus and Sufis. We celebrated Birsa Munda ji’s 157th birth anniversary with Adivasis from across India, honoured Indira Gandhi ji’s birth anniversary with a Shakti walk to celebrate women, and held a unique public meeting of tens of thousands of Adivasi women.
Across Maharashtra, we listened to people who work hard but are being denied the fruits of their tapasya. Farmers told us that their longstanding distress has worsened in recent years due to rising costs, uncertain prices, and the failure of insurance schemes to support farmers in bad years. Youth told us their worries about finding work which meets their dreams, despite their hard work and sacrifice. Adivasis, who are the original inhabitants of our country, struggle to get their rights – with laws meant to guarantee their rights diluted every day.
The root cause of this distress is the BJP govt’s actions, which concentrate wealth and power in the hands of a few. It is worsened by their agenda of dividing Indians against each other using culture, religion, caste and language.
Standing against this agenda is Maharashtra’s rich progressive tradition. It remains vibrant, with several dedicated civil society organizations and forward-thinking artists from the literary, cultural and film spheres. We are grateful for their wholehearted support to the Yatra, and for enriching our understanding and imagination. We also extend our thanks to the media for their participation.
We leave the land of Chatrapati Shivaji, resolved to take the message of Maharashtra’s sants and reformers across India. We are also filled with gratitude towards the people of Maharashtra, whose hospitality and heartfelt support has re-invigorated us.