मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुकच्या पोस्ट्सच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. त्यांनी पंतप्रधानांना टोला लगावलाय की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टला देशाला संबोधित करताना एकीकडे चीनची घुसखोरी वाढत आहे तर, दुसरीकडे चीनकडून आयातही होत आहे, असे का? ते सांगावे.” देशाच्या सन्मानासाठी तमाम देशवासी पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहतील, असेही ते म्हणालेत. त्यांनी फेसबुक हल्ल्यात मोदींचे सरकार हे चीनपुढे झुकत असल्याचाही आरोप केला आहे.
राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुक हल्ला
राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, खरा देशभक्त तोच आहे जो आपल्या देशाचे कोणतेही नुकसान होऊ देत नाही. खरा देशभक्त तोच असतो जो देशाच्या प्रत्येक इंचाच्या रक्षणासाठी लढतो. खरा देशभक्त तोच असतो जो आपल्या मातृभूमीची प्रतिष्ठा आणि अभिमान राखण्यासाठी समर्पित असतो. चीनने आपल्या देशाच्या सीमांवर कब्जा करण्याचे धाडस केले आहे, असा दावा त्यांनी केला.
भाजपासाठी विकास म्हणजे प्रसिद्धीवर पैसा खर्च?
- बेरोजगारीबाबत राहुल गांधींनी आणखी एका फेसबुक पोस्टमध्ये सरकारवर निशाणा साधला.
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे काय झाले?
- कौशल्याशिवाय भारताचे कर्मचारी स्वावलंबी कसे होऊ शकतात?
- भाजपा सरकारसाठी विकास म्हणजे प्रसिद्धीवर पैसा खर्च करायचा का?
राहुल गांधींचा आरोप: “पंतप्रधान मोदी चीनसमोर झुकतात”
- राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, सत्तेत येण्यापूर्वी चीनला ‘लाल डोळे’ दाखवणारे पंतप्रधान ८ वर्षे चीनपुढे झुकले आहेत.
- पंतप्रधानांच्या तोंडून चीनचे नावही निघत नाही.
- काँग्रेस नेत्याने विचारले की, जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांनी जनतेचे हित सर्वोपरि न ठेवता चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगण्याचा निर्णय का घेतला?
- खादी सोडून देशाची शान असलेल्या तिरंग्यासाठी चीनमधून आयात केलेल्या पॉलिस्टरचा सहारा घ्यावा लागला, याचे कारण काय?
- सीमेवर चीनची घुसखोरी वाढत असताना भारताची चीनकडून होणारी आयातही वाढत आहे, याचे कारण काय?
- पंतप्रधानांनी देशाला संबोधित करून त्याची कारणे सांगावीत.
- भारताच्या सन्मानासाठी प्रत्येक नागरिक त्याला साथ देईल, पण केव्हा, जेव्हा ती भारतमातेची असेल.