मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ गेल्या एका वर्षापासून शेतकरी दिल्लीच्या सर्व सीमेवर आंदोलन करत आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारामुळे दिल्ली पोलिसांनी दिल्ली सीमेवर बॅरिकेट्स टाकून रस्ते बंद केले होते. आता हे रस्ते पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहेत. गुरुवारी टिकरी सीमेकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला, त्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलीस गाझीपूर सीमेवरील बॅरिकेडिंग हटले आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींचे ट्विट
- या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
- त्यांनी आपल्या ट्विटर लिहिले की, आता दिसणारे अडथळे हटलेत, लवकरच तिन्ही कृषि कायदेही हटतील”… अन्नदाता सत्याग्रह झिंदाबाद!
- दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेजवळील गाझीपूरमधील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणाहून बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे.
अभी तो सिर्फ़ दिखावटी बैरिकेड हटे हैं,
जल्द ही तीनों कृषि विरोधी क़ानून भी हटेंगे।अन्नदाता सत्याग्रह ज़िंदाबाद!#FarmersProtest
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2021
बॅरिकेड्स कधी लावले
- केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, पोलिसांनी लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावल्या होत्या.
- पोलिस अधिकारी आणि मजूर गाझीपूरमधील राष्ट्रीय महामार्ग-९ वर लावलेले लोखंडी खिळे काढताना दिसले.