Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचे पत्र, वैज्ञानिक पद्धत वापरा, जगाला माहिती द्या आणि सर्व भारतीयांना लस!

May 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
rahul

मुक्तपीठ टीम

देशातील वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्याबरोबरच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याची विनंतीही राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

 

राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्रातून असाही आरोपही केला आहे की, केंद्र सरकारच्या अपयशामुळे देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराचा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. अशावेळी गेल्या वर्षासारखं गरिबांना कठीण प्रसंगाचा सामाना करावा लागू नये यासाठी तत्काळ आर्थिक मदत पोहचवण्यात यावं.

पुढे त्यांनी लिहीले की, ‘पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आलीय कारण आपला देश कोरोना त्सुनामीच्या दिशेने आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपलं सर्वात जास्त प्राधान्य असायला पाहिजे. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे.’

 

In such an unprecedented crisis, the people of India must be your foremost priority. I urge you to do everything in your power to stop the needless suffering that our people are going through.: Shri @RahulGandhi writes to PM Modi on #COVIDSecondWave pic.twitter.com/vNYpE03jUR

— Congress (@INCIndia) May 7, 2021

 

ते म्हणाले,’जगातील प्रत्येक सहा लोकांपैकी एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात विषाणूला आपलं स्वरूप बदलण्यासाठी आणि अधिक धोकादायक होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. हे या महामारीतून धडधडीतपणे समोर आलंय. मला भीती वाटते की आता ‘कोरोनाची ‘डबल म्युटेंट’ किती भयानक आहे, हे आपण पाहत आहोत. आणि ‘ट्रिपल म्युटेंट’ कदाचित एक मोठे संकट असू शकते.

 

त्यांच्या मते, या विषाणूचं अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकतं. त्यांनी पंतप्रधानांना सूचना दिली की, ‘हा विषाणू आणि त्याच्या विविध प्रकारांची वैज्ञानिक पद्धतीनं माहिती काढावी. विषाणूच्या म्युटेंटविरूद्ध लसींच्या प्रभावाचं मूल्यांकन केलं जावं. सर्व जनतेला त्वरीत लसीकरण सहभागी करून घ्यायला हवं. पारदर्शक होत उर्वरित जगाला आपल्या निष्कर्षांबद्दल माहिती दिली जावी.’

 

राहुल गांधींनी आरोप केला आहे की, केंद्र सरकारकडे कोरोनाविरुद्ध लसीकरणासंबंधित कोणतीही स्पष्ट रणनीती नाही आहे. महामारीवर विजय मिळवण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जात होती तेव्हा विषाणू आणखीनंच वेगाने फैलावत होता. ते म्हणाले की भारत सरकारच्या अपयशामुळे आज राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन अपरिहार्य दिसत आहे.

 

या परिस्थितीचा विचार करता, दुर्बल घटकातील लोकांना आर्थिक मदत आणि खाद्यान्न वस्तू उपलब्ध करुन द्याव्यात. जेणेकरून लॉकडाऊन दरम्यान गोरगरिबांना भोगावे लागणारे त्रास सहन करावे लागणार नाही. गेल्यावर्षी कोरोना साथीच्या विरुद्ध लढ्यात पूर्ण सहकार्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. या संकटात वेगवेगळ्या राजकीय पक्षांना विश्वासात घेतले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकजण एकत्रितपणे काम करुन भारताला सुरक्षित ठेवू शकेल, असे पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

 

 


Tags: lockdownPM Narendra modirahul gandhiकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीम्युटेंटराहुल गांधीलसीकरणलॉकडाऊन
Previous Post

छोटा राजनचं काय झालं? कोरोनानं मृत्यूची बातमी, मात्र रुग्णालयाकडून इंकार!

Next Post

फायझर – बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग

Next Post
pfizer 2

फायझर - बायोनोटॅकच्या मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या मान्यता प्रयत्नांना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!