Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सीतेला मानत नाही तर, प्रभू श्री रामाचा जयघोष का करता?” राहुल गांधींची भाजप आणि आरएसएसवर टीका!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशातील आगर माळवा येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला आहे. “हे लोक ‘जय सियाराम’चा जयघोष करत नाहीत. कारण ते सीतेला मान देत नाहीत. त्यांच्या संघटनेत महिलांना स्थान नाही. मी आरएसएसच्या मित्रांना सांगू इच्छितो की, जय श्री रामा व्यतिरिक्त ‘जय सियाराम’ आणि ‘हे राम’ वापरा, सीताजींचा अपमान करू नका.” असे वक्तव्य राहुलल गांधीनी या जाहीर सभेत केले.

‘जय सियाराम’ किंवा ‘हे राम’ असा जयघोष करण्याचा राहुलल गांधींचा भाजप आणि आरएसएसला सल्ला!

राहुल गांधी म्हणाले की, ‘जय सियाराम’ किंवा ‘जय सीताराम’ असा जयघोष करावा. याचा अर्थ राम आणि सीता एक आहेत असा होतो. पण, सीतेला मानत नसल्याने भाजप आणि आरएसएस जय श्री रामचा जयघोष करतात. भाजपने आता आपला नारा बदलावा, असा सल्ला त्यांनी दिला.

राहुल गांधींनी ‘या’ तीन जयघोषांचे दिले स्पष्टीकरण

१. ‘हे राम’

  • हे राम म्हणजे, अहो राम.
  • राम ही एक जीवनपद्धती होती, प्रभू राम ही केवळ एक व्यक्ती नव्हती, जीवन जगण्याची पद्धत, प्रेम, बंधुता, आदर, तपश्चर्या, त्यांनी संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग शिकवला.
  • हे राम असाही जयघोष करावा कारण, प्रभू राम ही भावना आपल्या हृदयात आहे आणि त्याच भावनेने आयुष्य जगायचे असते.

२. ‘जय सियाराम’

  • ‘जय सियाराम’ म्हणजे जय सीता आणि जय राम.
  • सीता आणि राम एकच आहेत यातून हे स्पष्ट होते.
  • त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम असा जयघोष करावा.
  • प्रभू राम सीताजींच्या सन्मानासाठी लढले. आम्ही जयासियाराम म्हणतो आणि सीतेसारख्या महिलांचा समाजात आदर करतो.

३. ‘जय श्री राम’

  • यामध्ये आपण प्रभू रामाचा जयजयकार करतो.
  • भाजपवाले जय श्री राम म्हणतात, पण जय सियाराम आणि हे राम का म्हणत नाहीत.
  • प्रभू राम ज्या भावनेने जीवन जगले त्या भावनेने आरएसएस आणि भाजपचे लोक जीवन जगत नाहीत.
  • रामाने कोणावरही अन्याय केला नाही.
  • समाजाला जोडण्याचे काम रामाने केले.
  • रामाने सर्वांना आदर दिला. आरएसएस आणि भाजपचे लोक प्रभू रामाच्या जीवनपद्धतीवर चालत नाहीत.
  • ते सियाराम आणि सीताराम करू शकत नाहीत, कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही, म्हणून ती जयसिया रामाची संघटना नाही, त्यांच्या संघटनेत सीता येऊ शकत नाही.

भाजप आणि आरएसएसला सीतेचा आदर करण्याची विनंती!

राहुल गांधी म्हणाले की, “भाजप आणि आरएसएस जय सियाराम म्हणू शकत नाहीत कारण पक्षात एकही महिला नाही आणि ती ‘सियाराम’ची संघटना नाही. तिथे सीता नाही. त्यांनी सीतेला बाहेर ठेवले. म्हणून माझ्या आरएसएस मित्रांना विनंती आहे की, कृपया जय श्री राम तसेच जय सियाराम आणि हे राम असा जयघोष करा.”


Tags: BJPCongressHey RamJai SiyarammuktpeethPrabhu Shri Ram Jayghoshrahul gandhirssआरएसएसकॉंग्रेसघडलं-बिघडलंजय सियारामप्रभू श्री राम जयघोषभाजपमुक्तपीठराहुल गांधीहे राम
Previous Post

आता UPSC रेल्वेसाठी वेगळी IRMS परीक्षा घेणार! कशी असणार नवी परीक्षा?

Next Post

तेव्हा हे कुठल्या ‘गँग’मध्ये होते?

Next Post
■ दिवाकर शेजवळ

तेव्हा हे कुठल्या 'गँग'मध्ये होते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!