मुक्तपीठ टीम
अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने पेगासस स्पायवेअरवरून भारत सरकारने २०१७ मध्ये संरक्षण व्यवहारासाठी केलेल्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्येच इस्रायली स्पायवेअर पेगाससचीही खरेदी केली होती, असा दावा केला आहे. त्यानंतर देशातील राजकारण चांगलच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकरणावरून आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारने देशद्रोह केल्याचा आरोप केला आहे. तसेच चौकीदाराकडूनच हेरगिरी सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
मोदी सरकार ने हमारे लोकतंत्र की प्राथमिक संस्थाओं, राज नेताओं व जनता की जासूसी करने के लिए पेगासस ख़रीदा था। फ़ोन टैप करके सत्ता पक्ष, विपक्ष, सेना, न्यायपालिका सब को निशाना बनाया है। ये देशद्रोह है।
मोदी सरकार ने देशद्रोह किया है। pic.twitter.com/OnZI9KU1gp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2022
- राहुल गांधी यांनी ट्विट करून हल्ला चढवला आहे.
- मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती.
- विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केलं.
- हा देशद्रोह आहे.
- मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल
- अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्सने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे.
- त्यात पेगाससवर नवा दावा केला आहे.
- भारताने २०१७ मध्ये मिसाईल सिस्टिम सहीत डिफेन्स डिलसाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रुपाने इस्रायली स्पायवेअर पेगाससची खरेदी केली होती.
- फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हिस्टिगेशनने स्पायवेअर खरेदी केल्याचं वर्षभराच्या तपासाअंती समोर आलं आहे.
- देशांतर्गत देखरेखीच्या वापराच्या नावाने एफबीआयने या सॉफ्टवेअरची टेस्टिंगही केली आहे.
- मात्र गेल्यावर्षी कंपनीने पेगाससचा वापर न करण्याचा निर्णय घेतला.