मुक्तपीठ टीम
भाईजान सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहेत. नेहमीप्रमाणे येत्या १३ मे ला म्हणजेच ईदला जगभरातील चित्रपटगृहासह पे-पर-व्यू सर्विस झी प्लेक्सवरही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटकडून ‘राधे’ चित्रपटाला कोणतेही सिन्स कट न करता चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी यू.ए. सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.
आतापर्यंतचा सर्वात छोटा चित्रपट
- सेन्सॉर बोर्डच्या म्हणण्यानुसार, ‘राधे’ हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना पाहाणासारखा आहे.
- तसेच ‘राधे’ हा चित्रपट १ तास ५४ मिनिटांचा आहे.
- सलमान खानच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीतील हा लांबीने सर्वात छोटा चित्रपट ठरणार आहे.
- याआधी सलमानचे फक्त दोनच चित्रपट २ तासांचे होते.
- त्यातील एका म्हणजे २००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मै और मिसेज खन्ना’ आणि २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेरीगोल्ड’ हे चित्रपट होते.
‘राधे’बद्दल सर्व काही…
- सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट प्रभुदेवा यांनी दिग्दर्शित केला आहे.
- आतापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आणि सिटी मार, दिल दे दिया ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहे.
- चित्रपटाच्या ट्रेलर आणि दोन्ही गाण्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
- राधे चित्रपटात सलमानव्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
परदेशातील चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
- ‘राधे’ हा चित्रपट ४० परदेशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
- यात मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि युरोपमध्येही केला जाणार आहे.
- गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन लागल्यानंतरचा इंग्लंडमधील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार ‘राधे’ हा पहिला चित्रपट ठरणार आहे.