मुक्तपीठ टीम
आधार कार्ड हे सध्या खूप महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. ते बँक खात्याशी आणि पॅन कार्डशी जोडलेले असते. तसेच सरकारी योजनांमध्येही याची आवश्यकता असते. आता आधार कार्ड आयडी कार्ड म्हणूनही वापरले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे नेहमीच आधार कार्ड असणे महत्वाचे आहे. बहुतेक लोकांकडे असलेले आधार कार्ड जाड कागदावरचे कलर प्रिंटांऊट असते. ते कागदाचे असल्याने फाटण्याची भीती असते. मात्र, आता तुम्ही एटीएम कार्डसारखे दिसणारे पीव्हीसी आधार कार्डही मिळवू शकता. तेही आधार कार्ड जारी करणार्या विभागाच्या यूआयडीएआय वेबसाइटद्वारे ते थेट स्पीड पोस्टद्वारे थेट आपल्या घरी मिळवू शकता.
आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, गिलोचे पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट सारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात क्यूआर कोडद्वारे ऑफलाइन पडताळणी त्वरित केली जाते. या कार्डसाठी तुम्हाला फक्त ५० रुपये फी भरावी लागेल.
आधार पीव्हीसी कार्ड कसं मिळवाल?
१. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा (uidai.gov.in/my-aadhaar/get-aadhaar.html)
२. खाली स्क्रोल करा आणि खाली जा आणि ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ पर्यायावर क्लिक करा
३. तुम्हाला १२ अंकी आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड प्रविष्ट करावा लागेल
४. आता सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा
५. आता आपल्या मोबाइल नंबरवर येणारा ओटीपी एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
६. आपल्याला तपशील तपासावा लागेल. सर्व काही ठीक झाल्यावर देय द्यावे लागेल
७. आपण यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे देऊ शकता
८. पैसे भरल्यानंतर आपल्याला एक स्लिप मिळेल. कार्ड काही दिवसात स्पीड पोस्टद्वारे पोहोचेल
पाहा व्हिडीओ: