मुक्तीठ टीम
देशच नाही तर जग गाजवलेला २०१७चा शेतकरी संप केलेल्या अहमदनगरमधील पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी पाच वर्षांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. ५ जूनपर्यंत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत धरणे आंदोलन केले जाईल. गावातील आणि बाहेरहून आलेले शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत.
५ वर्षानंतर पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक!!
- २०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं.
- पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यभर पसरली होती.
- केवळ राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्रालाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती.
- आता पुन्हा एकदा पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहेत.
- १ जून पासून पुढील पाच दिवस पुणतांबा गावात धरणे आंदोलन केलं जाणार आहे.
- पुढील पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत, तर हे आंदोलन आणखी तीव्र करू अशा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
- बळीराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
हक्काच्या मागण्यांना दाद नाही, मान्य करून घेण्यासाठी शेतकरी आंदोलन!
- दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
- गेल्या आठवड्यात पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा आयोजित करून एकूण १६ ठराव मंजूर केले होते.
- याबाबतच निवेदन सरकारला पाठवलं होतं.
- संबंधित निवेदनावर सात दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास १ जूनपासून धरणे आंदोलन केलं जाईल, अशा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता.
- त्याप्रमाणे पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.