मुक्तपीठ टीम
पुण्यात एका भामट्या तरुणीचं काही पुरुषांच्या आंबटशौकिन कमजोरीचा फायदा उचलत भलामोठा गंडा घालण्याचं रॅकेट उघडकीस आलं आहे. दिपाली कैलास शिंदे ही २८ वर्षांची तरुणी वर्तमानपत्रांमध्ये मिनाक्षी फ्रेंडशिप क्लबची जाहिरात देत असे. या क्लबच्या माध्यमातून पुरुषांना हाय-प्रोफाइल महिलांना डेट करण्याचं आमिष दाखवलं जात असे. तिच्या आमिषाला भुलवून जाळ्यात अडकलेल्या एका पुरुषाने तिला ६० लाख दिले. अखेर त्याच्या लक्षात आले की आपल्याला गंडा घातला जात आहे, तेव्हा तो पोलिसांकडे गेला आणि पुण्याच्या या भामट्या तरुणीला पोलिसांनी गजाआड केलं.
पुण्याची भामटी, फसवणूक फ्रेंडशिपची!
- पुण्यात हायप्रोफाईल महिलांना डेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याची घटना नुकतीच उघड झाली आहे.
येथे दिपाली कैलास शिंदे या २८ वर्षीय तरुणीला ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. - पुणे सायबर पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुणी वर्तमानपत्रांमध्ये फ्रेंडशिप क्लबची जाहिरात देत असे.
- या क्लबच्या माध्यमातून पुरुषांना हाय-प्रोफाइल महिलांना डेट करण्याचं आमिष दाखवलं जात असे.
- या प्रकरणातील तक्रारदार पुरुषाने जाहिरातीतील नंबरहून तिला संपर्क साधला.
- त्याने त्या फ्रेंडशिप क्लबमध्ये सामील होण्यासाठी अनेकदा पेमेंट केले
हायप्रोफाइल तरुणींच्या आमिषाने २ लाखापासून ६० लाखांपर्यंत…
- सुरुवात २ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेतले.
- यानंतर त्याला एकामागून एक अनेक पेमेंट घेतले.
- ही रक्कम ६० लाखांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्या पुरुषाला जाग आली.
- त्यानंतर त्याने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.
- यानंतर पोलिसांनी बँकेतून झालेल्या व्यवहारांची पडताळणी करून आरोपी तरुणीला अटक केली.
आणखी कोणी लुबाडले गेले का त्याचा तपास सुरु…
- पुणे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक संगीता माळी आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या तपासानंतर वानवडी परिसरातून दिपाली कैलास शिंदेला अटक करण्यात आली.
- सध्यातरी एकच प्रकरण समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- मात्र आरोपी महिलेने अशाप्रकारे आणखी काहींची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.