मुक्तपीठ टीम
सीआयएसफच्यावतीनं पुणे ते दिल्ली अशा सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. अतिरिक्त महासंचालक अनिलकुमार यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या येरवडा कारागृहातून रॅलीचा प्रारंभ झाला. पुणे ते दिल्ली दरम्यान १७ हजार ३ किलोमीटरचा पल्ला कापत ही सायकल यात्रा आझादीचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे.
आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पुणे-दिल्ली सायकल यात्रेत सीआयएसएफचे जवान सहभागी झाले आहेत. या सायकल रॅलीचं राजगुरुनगर येथे जोरदार स्वागत झालं. या वेळी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करण्यात आली. राजगुरु यांचे वंशज सत्यजित राजगुरू आणि महानिरीक्षक के.एन. त्रिपाठी, अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार आणि अन्य अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते..
राजगुरुनगर मधील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.. या सायकल रॅली मध्ये राजगुरूनगर मधील सायकल ग्रुप ने पण आपला सहभाग नोंदविला..
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवास अभिवादन…
- पुणे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजादी का अमृत महोत्सव निमित्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF आयोजित पुणे ते राजघाट सायकल रॅली ला ADG अनिल कुमार CISF यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
- या सायकल रॅलीमध्ये एकूण १० सायकल पट्टू सहभागी झाले आहेत.
- ही रॅली ४ सप्टेंबर ला सुरुवात होऊन २ ऑक्टोबर रोजी दिल्ली तील महात्मा गांधी यांच्या समाधी राजघाट ला पोहोचणार आहे.