Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. दीपक सावंत लिखित “वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी” आणि “उद्धव ठाकरे- द टायगर” या दोन पुस्तकांचे प्रकाशन

"डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 30, 2022
in घडलं-बिघडलं
0
Publication of two books of dr deepak sawant

मुक्तपीठ टीम

छायाचित्रणाला एक चिकाटी आणि जिद्द लागते ती डॉ. दीपक सावंत यांच्यात असून त्यांच्या आजच्या या पुस्तकामुळे त्यांच्यासमवेत केलेला जंगल भ्रमंतीचा अनुभव, ती दृष्ये जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहिली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Publication of two books of dr deepak sawant

राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या “वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी’’ आणि “उद्धव ठाकरे- द टायगर”  या दोन पुस्तकाचे प्रकाशन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या कार्यक्रमास दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.  कार्यक्रमास ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, प्रकाशक आनंद लिमये यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Publication of two books of dr deepak sawant

आजवर अनेक प्रकाशने झाली, पण आजचा प्रकाशन कार्यक्रम वेगळा आहे, डॉ.दीपक सावंत यांना छायाचित्रकार, लेखक म्हणून एक वेगळी ओळख देणारा हा कार्यक्रम आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत केलेल्या अनेक जंगल भ्रमंतीचा आपला अनुभव यावेळी सांगितला. ज्या कान्हा जंगलापासून वाईल्ड फोटोग्राफीला आपण सुरुवात केली तिथे फिरत असतांना वनरक्षकांच्या असलेल्या अडीअडचणी जाणवल्या, त्यातून आरोग्य शिबीराचे आयोजन, रुग्णवाहिकेची उपलब्धता, औषधांची उपलब्धता अशा अनेक बाबींच्या पुर्ततेत डॉ. सावंत यांनी केलेले कामही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वनरक्षकांच्या अनेक अडचणी असतात, त्यांच्या आरोग्याचे, कुटुंबाचे आणि मुलांचे शिक्षणाचे प्रश्न  खूप वेगळे असतात हे या जंगल भ्रमंती दरम्यानच कळाल्याचे ते म्हणाले. वन्यजीवांना आपण त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत, इथे वावरण्याची एक शिस्त असते असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. सावंत यांनी कॅमेऱ्यानेच नाही तर लेखणीने जंगल टिपले असल्याचे या दोन पुस्तकांवरून दिसून येते.

Publication of two books of dr deepak sawant

पुस्तक प्रकाशनासाठी डॉ. सावंत यांचे अभिनंदन करून देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी  जंगल भ्रमंतीबरोबर गडकिल्ल्यांचे, वारीचे छायाचित्रण करतांना जीव ओतून काम केल्याचे दिसते. यातून जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख निर्माण झाली. येथे मिळालेला संयम, अनुभव आणि शांत राहून “क्लिक” करण्याची निर्णय क्षमता त्यांना मुख्यमंत्री पदाच्या वाटचालीत उपयोगी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना योग्य दिशा दिली, सगळ्या यंत्रणांना समवेत घेऊन काम केले. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संघटनांनी घेतली. त्यामुळे अशा व्यक्तीसमवेत छायाचित्रण करायला मिळणे, जंगलभ्रमंती करायला मिळणे भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य डॉ. सावंतांना लाभले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगलभ्रमंतीचा आपला अनुभव या पुस्तकांच्या आणि छायाचित्रांच्या माध्यमातून सांगितला आहे.

Publication of two books of dr deepak sawant

आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ. दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगल भ्रमंतीचा आणि त्यांच्यासमवेत केलेल्या छायाचित्रण कलेचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, वन, जंगल वाचवण्यासाठीचा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि काम यानिमित्ताने जवळून पाहता आले. माझ्यासह सुरेश प्रभु, सुभाष देसाई, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत जंगलभ्रमंती केली आहे. त्यावेळी त्यांच्यातील माणूस आम्हा सर्वांनाच जवळून पहावयास मिळाला. ते आपले या क्षेत्रातील गुरु आहेत. फोटोग्राफी करतांना ते अतिशय बारीक गोष्टींची काळजी घेतात हे जाणवले. पर्यावरणीय बदलाचे परिणाम थोपवण्यासाठी जंगले, वने वाचली पाहिजेत, असेही ते म्हणाले. डॉ. सावंत यांनी उद्योग मंत्र्यांसमवेत कोविड सेंटर, महारक्तदान शिबिरात काम करता आल्याचा आनंदही व्यक्त केला.


Tags: cm uddhav thackerayDR Deepak SawantUddhav Thackeray - The tigerWild life PhotoBiographyउद्धव ठाकरे- द टायगरडॉ. दीपक सावंतमुख्यमंत्री उद्धव ठाकरेवाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी
Previous Post

“वाइन दारू नाही असे संजय राऊत का म्हणतात?” किरीट सोमय्यांचा सरकारी निर्णयाआधी राऊतांवर वाइन भागिदारीचा आरोप

Next Post

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीच्या मुकाबल्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहनं – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
Disaster management Vehicles

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीच्या मुकाबल्यासाठी शीघ्र प्रतिसाद वाहनं - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!