Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

"राजा माने यांचे पुस्तक सजीव व प्रेरणादायी" : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Publication of the book 'Jyanni Abhal Kavet Ghetala' by the Governor

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या 75 व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

 

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने लिखित ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाला माजी राज्यपाल डॉ डी.वाय पाटील, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजा माने, रेखाचित्रकार नितीन खिलारे व बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे, तसेच महाराष्ट्र राज्य देखील आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अश्यावेळी राज्यातील 75 प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तीचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून त्याचे रसपान वाचकांनी करावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

 

पुस्तक विकत घेऊनच वाचावे

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना मोफत देण्याच्या प्रथेला विरोध करताना प्रत्येकाने पुस्तक विकत घेऊनच वाचावे, अशी आग्रही सूचना राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केली. यावेळी राज्यपालांनी स्वतः पैसे देऊन ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाची प्रत विकत घेतली.

 

आजकाल समाजात कर्तृत्व व नम्रता हे गुण एकत्र अभावाने आढळतात असे मत व्यक्त करताना, राजा माने यांनी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील पुस्तक लिहिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असलेली सुसंवादाची परंपरा पुन्हा यावी असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

 

यावेळी चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या व पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. सोलापूर येथील शिवरत्न शेटे व संतोष ठोंबरे यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.

 

 


Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!

Next Post

“विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे, निवडणूक जिंकतील मोदीजीच!”

Next Post
Chandrakant Patil

"विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे, निवडणूक जिंकतील मोदीजीच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!