Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘भरारी’चे प्रकाशन; ज. मो. अभ्यंकरांचे आत्मचरित्र प्रेरणादायी – सुभाष देसाई

January 22, 2022
in घडलं-बिघडलं
0
Publication of Maharashtra Chamber Magazine by Deepak Kapoor

मुक्तपीठ टीम

शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक भान ठेवून वंचित घटकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या ज. मो.  अभ्यंकरांचे ‘भरारी‘ हे आत्मचरित्र सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्‍गार मराठी भाषा मंत्री सुभाष  देसाई यांनी काढले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या ‘भरारी‘ या आत्मचरित्राचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

            

यावेळी खासदार विनायक राऊत, मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक, प्रकाशक अशोक कोठावळे, सतीश त्रिपाठी आदी उपस्थित होते.

           

सुभाष देसाई  पुढे म्हणाले, अभ्यंकरांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या सहवासात आलेल्या विविध व्यक्तिमत्वाचा जवळून परिचय घडतो. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष याद्वारे दिसतो. शिक्षण हेच ध्येय ठेऊन अभ्यंकरांनी विविध योजना, उपक्रम राबविले. बालकामगार प्रथेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व कार्याचा परिचय त्यांच्या भरारी पुस्ताकातून घडतो. शिक्षण क्षेत्रात काम करु इच्छीणाऱ्या तरुणांसाठी हे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणा देणारे ठरेल असेही ते म्हणाले.

            

खासदार विनायक राऊत यांनी अभ्यंकर यांचा उल्लेख ‘शिक्षण क्षेत्रातील सुवर्णमणी‘  असा केला. शिक्षणाशी संबधीत सर्व शासन निर्णय अभ्यंकरांना मुखोद्गत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील चालता बोलता विश्वकोष असे विशेषण विनायक राऊत यांनी अभ्यंकरांना बहाल केले.

            

मुख्य माहिती आयुक्त सुमीत मलिक यांनी अभ्यंकरांच्या आत्मचरित्राची आपण वाट बघत होतो असे सांगून ते अविरत कार्यरत राहावेत आणि त्यांच्या कार्याचे असे अनेक खंड या पुढे प्रकाशित व्हावेत अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            

भरारी या आत्मचरित्राचे प्रकाशन मॅजेस्टिक प्रकाशन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या निर्मीती प्रक्रीये विषयी मॅजेस्टिकचे  अशोक कोठावळे यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती अपवादानेच आत्मचरित्र लिहीतात या पार्श्वभूमीवर भरारीचे वेगळेपण अधोरेखित होते असेही त्यांनी सांगितले.


Tags: BharariJM Abhyankarsubhash desaiज. मो. अभ्यंकरभरारीसुभाष देसाई
Previous Post

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

Next Post

राज्यात ४६ हजार ३९३ नवे रुग्ण, ३० हजार ७९५ रुग्ण बरे! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती?

Next Post
MCR Maharashtra Corona Report

राज्यात ४६ हजार ३९३ नवे रुग्ण, ३० हजार ७९५ रुग्ण बरे! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!