Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र पोर्टलद्वारे ऑनलाईन शिक्षण द्या”

भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

June 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
divya dholay

मुक्तपीठ टीम

शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुलभरीत्या प्रवेश देण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयामध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करून त्यांना राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्वतंत्र पोर्टलद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

दिव्या ढोले यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात आर्थिक परिस्थिती अभावी मागील शैक्षणिक वर्षाची शाळांची फी भरण्यास असमर्थ ठरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास शाळांकडून मज्जाव केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांची व पालकांची फी साठी अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

 

शालेय शिक्षण विभागाने १६ जून २०२१ रोजी आरटीई अधिनियमानुसार प्रवेश मिळालेल्या नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुलभरीतीने प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेकडून ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) नाकारण्यात आले तर अशा विद्यार्थ्यांना या सर्टिफिकेट अभावी प्रवेश नाकारला जाऊ नये, जन्म तारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरावा असे शासन निर्णयात म्हटले आहे. या निर्णयाचा फायदा नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना होत आहे. या निर्णयात १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात यावा असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

 


Tags: BJPBJP divya dholayदिव्या ढोलेवर्षा गायकवाडशालेय शिक्षण विभाग
Previous Post

“आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात”- सुनील केदार

Next Post

“पंतप्रधान मोदी व भाजपाने बंजारा समाजाची फसवणूक केली!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"पंतप्रधान मोदी व भाजपाने बंजारा समाजाची फसवणूक केली!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!