मुक्तपीठ टीम
कोकणात राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध मावळत असल्याचा साक्षात्कार राज्यातील राजकीय नेत्यांना होत आहे. मात्र, प्रत्यक्षात रिफायनरी विरोधातील जनमत आजही तीव्र असल्याचं दिसत आहे. रिफायनरी विरोधात मध्यरात्री माळरानावर आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो महिला-पुरुष, तरुण आणि वृद्ध नागरिक सहभागी होते. पावसाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत विरोधाचा एल्गार करण्यात आला.
मायभूमीला वाचवू, तर आम्ही वाचू!
- रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी नरेंद्र जोशी यांनी गावकऱ्यांची भूमिका मांडली.
- मायभूमीला वाचविण्यासाठी आम्ही रिफायनरीला विरोध करत आहोत.
- नुसता विरोधाला विरोध ही आमची भूमिका नाही.
- मायभूमी वाचली, तर आम्ही वाचू!अशी आमची भूमिका आहे.
पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप
- पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
- अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पण सरकारचा निषेध म्हणून रात्रीपासून मोठा जमाव जमला आहे.
- आमच्या जमिनी आहेत त्यांची आम्ही राखण करू रात्रभर असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
- सगळं बेकायदेशीर चालू आहे, आमचा रिफायनरीला विरोध ठाम आहे, अशी भूमिका सत्यजीत चव्हाण यांनी मांडली.
भर पावसात पावसात दडपशाही विरोधी आंदोलन सुरूच!!
- राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी विरोधात शिवणे खुर्द, येथील गावकरी आक्रमक झाले होते.
- आज पुन्हा एकदा रिफायनरीच काम गावकऱ्यांनी रोखलं आहे.
- रिफायनरीच्या पथकांना घेरत कष्टकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध त्यांनी केला.