मुक्तपीठ टीम
भाजपाच्या नवी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जेपी नड्डा यांनी गुरुवारी जाहीर केली आहे. भाजपाची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून ८ नेत्यांना संधी मिळाली आहे. या राष्ट्रीय कार्यकरिणीत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण यात भाजपा नेते खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
कोणाकोणांचा असणार समावेश
- भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण ३०९ घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत ५० विशेष आमंत्रित आणि १७९ स्थायी सदस्य असणार आहेत.
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.
- प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून कोणाला मिळाली संधी?
- राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-नितीन गडकरी
- राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-पीयूष गोयल
- राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-प्रकाश जावडेकर
- राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
- राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र-चित्रा वाघ
- राष्ट्रीय सचिव-विनोद तावडे
- राष्ट्रीय सचिव-सुनील देवधर
- राष्ट्रीय सचिव-पंकजा मुंडे
- विशेष निमंत्रित-सुधीर मुनंगटीवार
- विशेष निमंत्रित-आशिष शेलार
- विशेष निमंत्रित-लड्डाराम नागवाणीं
- राष्ट्रीय प्रवक्ते-सुनील वर्मा
- राष्ट्रीय प्रवक्ते-हिना गावित
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- राज्य प्रदेशाध्यक्ष- चंद्रकांत पाटील
- महाराष्ट्राचे प्रभारी सीटी रवी,
- महाराष्ट्राचे प्रभारी-ओमप्रकाश धुर्वे
- महाराष्ट्राचे प्रभारी-जयभान सिंग पवैय्या