Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जय भीम चित्रपटाच्या निमित्ताने….

November 13, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
jai bheem movie 13 -11

शुध्दोधन कांबळे

एखादा वास्तविक व ऐतिहासिक चित्रपट खूप यशस्वी होतो तेंव्हा त्यावर वाद होणे हे आपल्याकडे नित्याचे झाले आहे. जय भीम या चित्रपटाबद्दल पण हे घडत आहे, एक वर्ग या चित्रपटाची तोंडभरून स्तुती करत आहे तर दुसरा वर्ग चित्रपटात पोलिसांच्या चित्रणावर आक्षेप नोंदवित आहे. कोर्ट रुम ड्रामा असलेल्या हा चित्रपट कोठडीत मृत्यू झालेल्या राजकन्नु या ईरुला जमातीतील व्यक्तीवरील हेबिअस काॕर्पसच्या केसवर आधारित आहे. हि घटना १९९३ मध्ये तामिळनाडू मध्ये प्रत्यक्षात घडली होती. चंद्रु या वकीलाने ही केस यशस्वीपणे हाताळून पीडीत कुटूंबाला न्याय मिळवून दिला होता. हा वास्तविक चित्रपट दिग्दर्शक टी. ग्यानवेल व अभिनेता सुर्या यांच्या मेहनतीने उत्कृष्ट बनला आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतूक होत असताना काही बाबींवर आक्षेप नोंदविण्यात येत आहे.

समाजातील एक वर्ग असा आहे ज्यांना दलित, अदिवासी सारख्या पीडित समुदायांवरील अत्याचाराची क्रूरता किती तीव्र आहे हे माहिती नसते. जेंव्हा दलित साहित्यात अन्याय व अत्याचार वाचायला मिळू लागला त्यावर देखील दुःखाचे बाजारीकरण करण्यात येत असल्याचे आरोप झाला होता. या साहित्यातील जीवन हे वास्तविक आहे याचा स्वीकार व्हायला बराच वेळ लागला होता. पोलिस कायद्याचे रक्षक आहेत, या सर्वसाधारण धारणेला छेद देणारा हा चित्रपट आहे. कोठडीत दरवर्षी शंभर लोक मरतात, त्यापैकी पोलिस अत्याचारात मरणाऱ्यांची टक्केवारी दहा टक्यावरुन एक टक्यावर घसरली आहे. या आकडेवारीवर आपण विश्वास ठेवायचा का? हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. काही जाती व जमातीवर सतत अत्याचार का होतो? खैरलांजीसारख्या घटना घडणाऱ्या गावाला आदर्श गाव पुरस्कार कसा मिळतो? अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास तटस्थपणे केला तर आपल्याला वास्तविकता लक्षात येईल. बाॕलीवुडमध्ये पोलिसांचे होणारे उदातीकरण आणि हैद्राबाद रेप केसमध्ये घडणाऱ्या फील्मी घटना, यातून जय भीम चित्रपटातील पोलिसांच्या भुमिकेवर विश्वास करणे कठीण वाटते. परंतु हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे व सर्व घटनाक्रम कुठल्याही ‘तारीख पे तारीख ‘ सारख्या फिल्मी संवादाविना दाखविल्यामुळे हा चित्रपट परिणामकारक ठरला आहे.

 

एखाद्या समुहातील काही लोक गुन्हेगार असल्यामुळे सर्व समुदाय गुन्हेगारीच्या चष्म्यातून पाहणे हे जसे चुकीचे तशाच प्रकारे काही पोलिसांच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्व पोलिस खाते चुकीचे समजणे चुकीचे आहे. या उलट हा चित्रपट पोलिस व कायदा यावरचा उडत चालेला विश्वास दृढ करणारा आहे. न्याय व्यवस्था सुरळीत चालविण्यासाठी वकील व न्यायाधीश यांची जशी जबाबदारी आहे तशीच ती न्याय मागणा-या व्यक्तीच्या ठाम भुमिकेवर देखिल आवलंबून आहे. या चित्रपटाची नायिका संगेनी कुठलाही प्रलोभन व दबावाला बळी न पडता आपल्या भुमिकेवर ठाम राहते. दलित व अदिवासी स्त्री ही दुहेरी पीडीता असते, पुरूष प्रधान पध्दतीचे व जातीयतेचे चटके तिला एकाच वेळेला सहन करावे लागतात. अशा परिस्थितीही अढळ राहणारी संगेनी मला युध्दात लढणा-या सैनिका सारखी बलशाली वाटते. संगेनी हे पात्र सर्व बाजूंनी संकटे असतांना परिस्थितीशी मुकाबला करण्याचे बळ देते. अशा संकाटाचा सामना करणारी स्त्री पण खरच होती का? असा प्रश्न देखील अनेक स्त्रीयांना पडू शकतो.

 

हा चित्रपट आंबेडकरवादी की मार्क्सवादी यावर चर्चा न करता ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष’ हा डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र सांगतो हे विशेष. न्या. चंद्रु यांना बाबासाहेबांपासून प्रेरणा मिळाली, ते सुरवातीला मार्कसवादी होते पण त्यांना पुढे पक्षातून काढण्यात आले होते. १९९१ मध्ये बाबासाहेबांच्या शंभराव्या जयंती निमित्त प्रकाशित झालेले त्यांचे साहित्य देशपातळीवर मोठ्या प्रमाणात वाचण्यात आले होते. बाबासाहेब आम्हाला उशीरा माहित झाले अशी खंत अनेक इतर राज्यातील लोकांनी अनेकदा बोलून दाखविली. माझ्या मत्ते न्या. चंद्रुचा प्रवास मार्कसवादाकडून आंबेडकराकडे झाला आहे. मुळात हा चित्रपट अन्याय व अत्याचारा विरुध्द लढण्याची प्रेरणा देऊन समता स्थापन करण्याची प्रेरणा देतो एवढेच पुरेसे आहे. कुठल्याही विचारधारेत बांधून त्याला मर्यादित करणे अयोग्य आहे. चित्रपटाचे शीर्षक देखील वादाचे कारण ठरत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच आंबेडकरी समाजाचे भावनिक संबंध चित्रपटा सोबत जोडले गेले. सोशल मीडीयावर प्रचार करीत याची अतुरतेने वाट पाहणे सुरु होते. या चित्रपटाणे आपल्याला निराश केले नाही, साऊथ मध्ये अशाप्रकारे चित्रपट बनविण्याची चांगली प्रथा सुरु झाली आहे. जय भीम म्हणजे संघर्षाचे प्रतिक होय म्हणून या चित्रपटाचे शीर्षक ‘जय भीम योग्यच आहे, आपण हा चित्रपट डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावा, एवढीच अपेक्षा.


Tags: Jai BheemShudhhodhan kambleजय भीमशुध्दोधन कांबळे
Previous Post

निवृत्ती वेतनधारकांच्या पैशावर राज्य सरकारचा डोळा

Next Post

राज्यात ९९९ नवे रुग्ण, १०२० रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ९९९ नवे रुग्ण, १०२० रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!