Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दुसरी बाजू समजून न घेता हेत्वारोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय?”

पुण्यातील 'साध्वी' सावित्रीबाई फुले उद्यान नावाच्या वादावर प्रा. हरी नरकेंचा सडेतोड सवाल

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
prof. hari narke

प्रा. हरी नरके / व्हा अभिव्यक्त!

साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान हे नाव ३० वर्षांपूर्वी दिले गेले. ते बदलण्याची मागणी करणे चुकीचे नाही, मात्र त्याची एक पद्धत आहे. आधी महापालिकेकडे तसं पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता, आणि त्यानंतर जर मनपा नाव बदलायला तयार झाली नसती तर मग समाजमाध्यमावर आवाज उठवणं अधिक योग्य ठरले असते.

 

ज्यांनी १९९१ साली हे नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या. त्याकाळात क्रांतीज्योती वा ज्ञानज्योती हे शब्द फारसे प्रचलितही नव्हते.

 

ज्यांनी उद्यानाला हे नाव दिले त्यांचा हेतू चांगला होता. मी त्यांना व्यक्तीशः ओळखतो. सावित्रीबाईंवरील आदरापोटीच साध्वी हा शब्द वापरला गेला. तेव्हाचे सांस्कृतिक संदर्भ नी हा ठराव देणाऱ्या भल्या लोकांचा सदहेतू महत्वाचा आहे. त्यांचा आदर ठेवूनच बदलाची मागणी करायला हवी. जेव्हा सावित्रीबाईंना बहुतेक सगळे लोक विसरले होते तेव्हा त्यांचे स्मरण कायम ठेवणारे हे लोक आहेत हे विसरू नका.

 

आज ‘साध्वी’ या शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झालेला असला तरी तेव्हा तो तसा नव्हता.

शिवाय पारंपरिक शब्द टाळण्याइतके बहुजन तेव्हा काटेकोर नव्हते, जागरूक वा दक्ष नव्हते. त्यांचे सांस्कृतिक भान तेव्हाही आजागृत होते नी आजही आहे. पण म्हणून त्यांची कृती कमी महत्वाची ठरत नाही.

 

या शब्दाला विरोध करणारे मात्र अज्ञानातून सापसाप म्हणत भुई धोपटत सुटलेत.

दुसरी बाजू समजून न घेता हेत्वारोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय? निव्वळ शाब्दिक आग्रहापोटी प्रतिकांच्या या लढाईत आपण आपल्याच पूर्वसूरींना दुसऱ्या छावणीत ढकलून टाकायचे काय?


Tags: hari narkeप्रा. हरी नरकेसाध्वी सावित्रीबाई फुले उद्यान
Previous Post

अरे मराठी मराठी…! मुंबई मनपाच्या मराठी शाळांची संख्या १० वर्षात ४१३ वरून २८०!!

Next Post

“विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
wild

"विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!