Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामान्य माणसांचे काही प्रश्न…एकनाथ शिंदे उत्तर देणार?

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Prof hari narke And Eknath Shinde

प्रा. हरी नरके / व्हा अभिव्यक्त!

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आकडा जुळून येत असतानाच महाराष्ट्रातील जनमानसातून त्यांच्याविरोधातील काही चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रा. हरी नरके यांनी सामान्य माणसांचे काही प्रश्न एकनाथ शिंदेंसमोर मांडून उत्तर मागितले आहे.

सामान्य माणसांचे काही प्रश्न…

  • माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब कधीही न गुजरातला गेले होते, ना आसामला. मग तुम्ही बंदोबस्तात १२०च्या स्पीडने आधी सुरतेला नी नंतर गोहाटीला का पळालात?
  • आपण कोणाला घाबरत नाही हे विधान महाराष्ट्रात येऊन का करीत नाही?
  • बळजबरी नाही तर “पाकिस्तानला नमवणाऱ्या महाशक्तीच्या” कोंडवाड्यात का बसला आहात?
  • हिंदुत्वाचा पुळका पी.ए.ला इडीची नोटीस आल्यावरच कसा काय आला?
  • कालपर्यंत ज्यांना “कुटुंबप्रमुख” म्हणत होतात, परमपूज्य म्हणत होतात, ते रातोरात खलनायक कसे काय झाले? हेच शिकवले बाळासाहेबांनी?
  • पक्ष बदलता येतो, “कुटुंबप्रमुख” नाही. तुमचे हे ” तथाकथित हिंदुत्व ” तुम्हाला “कुटुंबप्रमुख (बाप) ” बदलायला सांगते का? हा ज्येष्ठांचा आदर शिकवला तुमच्या हिंदुत्वाने ?
  • ज्यांनी पक्ष उभा करणाऱ्या मुंडे, खडसेंचे हाल केले, ते तुमची उपयुक्तता संपली की तुमचे काय हाल करतील याचाही राडीसनमध्ये मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्ये विचार करा.
  • “झाडास बांधीलियास झाड उपटून पळणारे” लढवय्ये नसतात, बाजारबुणगे असतात. “बचेंगे तो और लढेंगे” हे वचन कधी ऐकले आहे का?
  • बहुजनांना वापरा आणि संपवा, नाहीसेच करा हा ज्यांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे ही फक्त आत्महत्या आहे.
  • नवा कोरा व्हिडिओ बाजारात आलाय. हिटलरच्या जळीत घरातला (कॅम्पमधला) ज्यू म्हणतोय, “मी स्वखुशीने मुरदाघरात आलो आहे. इथे मला काहीच कमी पडू देणार नाहीत. इथे इडीचे दु:ख नाही. आहे फक्त बळी देण्यापूर्वी बक्र्याला सजवतात तसे सजवलेले अडीच दिवसांचे सुख!

See the source image

(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)


Tags: Eknath ShindeMaharashtraMaharashtra Political Crisisprof hari narkeShivsenaएकनाथ शिंदेप्रा. हरी नरके
Previous Post

मृग नक्षत्रात वरुण राजा बरसायचं विसरला की काय? शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं…

Next Post

महाराष्ट्रात चाललंय काय? नेटकऱ्यांकडून होतेय चेष्टा…मुख्यमंत्रीपद नको उपमुख्यमंत्रीच व्हायचंय!

Next Post
Shivsena meme

महाराष्ट्रात चाललंय काय? नेटकऱ्यांकडून होतेय चेष्टा...मुख्यमंत्रीपद नको उपमुख्यमंत्रीच व्हायचंय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!