Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनाथ मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ होणार! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Orphans

मुक्तपीठ टीम

भारतात अनाथ मुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आढळते. कोरोना काळात यात आणखी वाढ झाली. काही दाम्पत्यांना मूल होत नाही त्यामुळे ते मूल दत्तक घेण्याचा विचार करतात. परंतु, काही लोक दत्तक घेण्यासाठीची मोठी प्रक्रिया पाहूनच विचार सोडतात. सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी अंतर्गत मूल दत्तक घेण्यासाठी तीन ते चार वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आहे. लाखो अनाथ मुलं वाट पाहत असतात की आपल्यालाही कोणी तरी दत्तक घ्यावं. त्यामुळेच आता भारतात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची गरज असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने ही प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असल्याचे म्हटले होते.

दत्तक घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठीच्या मुद्द्यावर सरकार विचार करत आहे!

  • न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने ‘द टेम्पल ऑफ हीलिंग’ या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्रातर्फे उपस्थित अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांना हे सांगितले.
  • यावर नटराज म्हणाले की, “सरकार या मुद्द्यावर विचार करत आहे, उत्तर दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी द्यावा.”
  • खंडपीठाने नटराज यांना बालविकास मंत्रालयातील जबाबदार व्यक्तीला एनजीओसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनांवर विचार करण्यास सांगण्यास सांगितले.
  • तसेच अहवाल तयार करा आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करा.
  • खंडपीठाने वैयक्तिकरित्या उपस्थित एनजीओ सचिव पीयूष सक्सेना यांना त्यांची याचिका एएसजीसोबत शेअर करण्यास आणि दत्तक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना त्यांच्या सूचना देण्यास सांगितले.
  • त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरपर्यंत केली जाईल असे म्हटले.

पाहा:


Tags: Adoption Processgood newsmuktpeethorphansSupreme Courtअनाथ मुलघडलं-बिघडलंचांगली बातमीदत्तक घेण्याची प्रक्रियामुक्तपीठसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध, घरी-दारी, बाजारपेठांमध्येही उत्सवी उत्साह!

Next Post

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Next Post
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!