Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल अवचट: भवताल भेदकपणे उलगडत वंचितांबद्दल अपार कळवळ्याने वाचनीय लिहिणारे लेखक!

September 6, 2026
in प्रेरणा, विशेष
0
Anil Awachat 27-1-22 mix

प्रा. हरी नरके

अनिल अवचट यांचे प्रत्येक पुस्तक वाचनीय, भवताल भेदकपणे उलगडवून दाखवणारे आणि वंचित समाजाबद्दल अपार कळवळ्याने लिहिलेले आहे. त्यांचं ‘माणसं ‘हे पुस्तक तर अत्यन्त श्रेष्ठ प्रतीचे साहित्य म्हणून सर्वकालीन मास्टरपीस ठरावे. अनिलने कितीतरी विषय हाताळले. मध्यमवर्गीय, बुद्धीवादी वाचक वर्गाचा अनिल हा महत्वाचा वाटाडया. भारतीय सामाजिक विवेकाचा अनिल हा बुलंद आवाज होता.

अनेक वर्षं तो डॉ. बाबा आढाव यांच्यासोबत काम करायचा. त्याची पत्नी डॉ. सुनंदा (अनिता) ही हमाल वर्गासाठी अनेक वर्षे विनामूल्य दवाखाना चालवायची. तिनं मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची पायाभरणी केली. ही संस्था त्यांची मुलगी मुक्ता हिनं जपली. वाढवली.

अनिल हा अवलिया होता. मनस्वी. धडपड्या. लिहिणं, फिरणं आणि रसरसीत जगणं यात तो रमायचा. त्यानं आपलं आत्मचरित्र अनेक पुस्तकांमधून  लिहिलं. मी त्याच्या ताज्या स्वकथनपर पुस्तकावर अनिलचं आत्मचरित्र खंड ७३वा असं लिहिलं तर अनिलनं  त्यालाही लाईक केलेलं.अलीकडच्या काळात त्याची विविध छंदांवरची बरीच पुस्तकं आली. त्यांच्यामध्ये मात्र फारसा दम नव्हता.

सुनंदाचं अकाली जाणं अनिलला जिव्हारी लागलं. तो माझ्यापेक्षा वयानं आणि अनेक बाबतीत मोठा असला तरी मी त्याला अरेतुरे करावं असा त्याचा आदेश.  आम्ही नामांतर आंदोलनात ठाणे जेलमध्ये एकाच बराकीत होतो. तेव्हा २४ तास एकत्र असायचो. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहायला हवे. अनिलची दृष्टी चौफेर होती. त्याला शेकडो छंद होते. त्यामुळे तो कायम व्यग्र असायचा. त्याचेही काही विकपॉइंट होते. प्रत्येकाला असतात.

अनिलने माझ्या पिढीची सामाजिक दृष्टी विस्तारली. निवळ केली. ओतूरसारख्या खेड्यातून आलेल्या अनिलने सामाजिक दस्तऐवज या लेखनप्रकारात फार मोठी भर घातली. घरातला टिपिकल मध्यमवर्गीय वारसा नाकारून अनिल वंचितांमध्ये रमला. त्यांचा झाला. त्याचे रिपोर्ताज ह्या वाड्मय प्रकारातले लेखन अनेक पिढयांचे डोळे उघडण्याचे काम करील. श्री. म. माटे, साने गुरुजी यांचा वारसा अनिलने जपला, मोठा केला.

pro. hari narke

(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)


Tags: anil awachatpro. hari narakeअनिल अवचटप्रा. हरी नरके
Previous Post

अनिल अवचट: जाणं एका अवलियाचं…कला, साहित्य, समाजकार्य सर्वत्र संवेदनशील सहभाग!

Next Post

“राष्ट्र उभारणीतील काँग्रेसचे योगदान नाकारण्याचे षडयंत्र!” : तारिक अन्वर

Next Post
tariq Anwar

"राष्ट्र उभारणीतील काँग्रेसचे योगदान नाकारण्याचे षडयंत्र!" : तारिक अन्वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!