मुक्तपीठ टीम
कॉँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पक्ष सत्तेवर आला तर हे तीन कृषी कायदे रद्द केले जातील असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सांगितले. प्रियंका गांधी वड्रा यांनी सहारनपुरातील किसान महापंचायतीला संबोधित केले.
नवीन कृषी कायद्यांबाबत केंद्रावर हल्ला चढवत काँग्रेस नेते प्रियांका गांधी वड्रा यांनी सहारनपूर येथील मेळाव्यात सांगितले की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर कृषी कायदे रद्द केले जातील. पक्षाने आयोजित किसान पंचायतीत काँग्रेस महासचिव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांवरील शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला.
त्या म्हणाल्या की, “तीन कायदे म्हणजे काळा कायदे. काँग्रेसची सत्ता आल्यास ते हे कायदे रद्द केले जातील. कायदे संपुष्टात येईपर्यंत पक्षाची लढाई सुरूच राहिल.
प्रियंका गांधी वड्रा यांच्या भेटीपूर्वी सहारनपुरात कार्यक्रमावर बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मंजूर झालेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ काँग्रेसने किसान महापंचायत आयोजित केली होती.