Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरच्या पोलिसांना म्हाडाच्या सदनिकांचे वाटप

February 10, 2021
in सरकारी बातम्या
0
jitendra awhad

मुक्तपीठ टीम

 

पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १० मधील सदनिकाचे वाटप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ए-३ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी  प्रवीण आव्हाड,  जागृती मेहेर,  रुक्मिणी राठोड, अदिती सरनोबत, फिरोझ तडवी यांना सदनिकेचे प्रथम सूचना पत्रही प्रदान करण्यात आले. कोकण मंडळातर्फे उर्वरित सदनिका लाभार्थीना लवकरच प्रथम सूचना पत्र पाठविली जाणार आहेत.

 

असे झाले सदनिकांचे वाटप

  • म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे.

 

  • या योजनेतील टप्पा – ३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या ४ जानेवारी २०१९ रोजीच्या ठराव क्रमांक ६८०९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

 

  • १८६ सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरिता मार्च २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली.

 

  • त्यानुसार पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून १०९ अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली.

 

  • या १०९ कर्मचाऱ्यांना इमारतीतील कितव्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वितरित करावयाची, याची निश्चिती व त्यांचे वितरण करण्यात आले.

 

दरम्यान, पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी प्राप्त झाल्यास उर्वरित ७७ सदनिकांचेही वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले आहे.

 

या सदनिकांचे क्षेत्रफळ ४३४.९७ ते ४५३.२७ चौरस फूट असून या सदनिकांची अंदाजे विक्री किंमत २७.०० लाख रुपये आहे. या योजनेतील टप्पा-३ मधील इमारतींना वसई विरार शहर महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.

 

 


Tags: mhadaPalghar Policeपालघर पोलीसपोलीस कर्मचारीम्हाडा सदनिका
Previous Post

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारचे कृषी कायदे रद्द करणार, प्रियांका गांधीची महापंचायतीत घोषणा

Next Post

“ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष धोरण आखणार”

Next Post
yashomati thakur

"ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष धोरण आखणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!