Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रायगड किल्ल्याला भेटीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद भारावले…”ही माझ्यासाठी तीर्थयात्राच!”

December 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
Hon President at Raigat Fort Prog 1

मुक्तपीठ टीम

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ते रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती कोविंद यांची कन्या स्वाती कोविंद,  युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Hon President at Raigat Fort Prog 2

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या रायगड भेटीला आपण एक प्रकारची तीर्थयात्राच मानतो. या भेटीसाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष आभार  मानले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते, असेही कोविंद यांनी सांगितले.

Hon President at Raigat Fort Prog 6

राष्ट्रपती कोविंद आपल्या भाषणात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव व देशप्रेम वाढीच्या परंपरेची सुरुवात केल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्यकुशल वैशिष्ट्यांबद्दल आदर व्यक्त केला. भारतातील युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी “शिवराजविजया” या संस्कृत भाषेतील पुस्तकाचा भारतीय इतर भाषांमधून अनुवाद व्हावा, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

Hon President at Raigat Fort Prog 4

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय सामाजिक उत्थानासाठी केलेल्या विशेष कार्याप्रति राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरभाव व्यक्त केला.   “मराठा लाईट इन्फंट्री” या भारतीय सैन्याच्या युनिटच्या “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या युद्ध घोषणेचा त्यांनी आवर्जून उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान व्यक्त केला.

पश्चिम घाट आणि कोकण अशा या निसर्गसंपन्न क्षेत्रात पर्यटन आणि आधुनिकीकरणास अधिक वाव असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना आपण आजच्या २१ व्या शतकात साकारू शकतो, असे त्यांनी शेवटी अधोरेखित केले.

राष्ट्रपती कोविंद हे “रोप वे” ने रायगड किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी पत्नी व मुलीसह होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याशिवाय त्यांनी राजसदर येथील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.

या भेटीदरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि जतन कशा प्रकारे केले जात आहे, याबाबतचे संगणकीय सादरीकरण पाहिले. त्याचबरोबर यावेळी रायगड विकास प्राधिकरणाकडून राष्ट्रपती श्री.कोविंद यांना छत्रपती संभाजीराजे यांनी “रायगड सिग्निफिकंट मॉन्यूमेंन्ट्स” आणि “रायगड फोर्ट:-प्रोग्रेस ऑफ वर्क ” ही पुस्तके तर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड किल्ल्याची सचित्र माहिती देणारे “दि ग्रेट कॅपिटल:- रायगड” हे कॉफीटेबल स्वरूपातील पुस्तक दिले.

तत्पूर्वी किल्ले रायगडावर पोहोचल्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी,आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी राष्ट्रपती कोविंद यांचे स्वागत केले.

Hon President at Raigat Fort Prog 3

राजसदर येथील आयोजित स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपती कोविंद व त्यांच्या कुटुंबियांना दांडपट्टा, होन, महाराजांच्या आज्ञापत्राची प्रतिकृती या भेटवस्तू दिल्या. यावेळी प्रस्तावना करताना छत्रपती संभाजीराजे यांनी महामहीम राष्ट्रपती यांची आजची रायगड किल्ल्याला भेट, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याची भावना व्यक्त केली.


Tags: Chhatrapati Shivaji Maharajraigad fortramnath kovindSavita Kovindछत्रपती शिवाजी महाराजरामनाथ कोविंदरायगड किल्लासविता कोविंद
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी फेटरीत रक्तदान व भोजनदान

Next Post

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Next Post
maharashtra state election commission

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!