Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी पाड्यांवरची कलादालनं, बांबूपासून बनवलेल्या वस्तू, कुडाच्या घरांमध्ये आदिवासी संस्कृतीचे जतन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Tribal artists

गौरव पाटील

संस्कृती टिकवतं कोण? संस्कृती तेच टिकवतात जे संस्कृती जगतात. जे संस्कृती जगतात तेच संस्कृती जगवतात. संस्कृतीचं संवर्धन करतात. आता पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उधवा कुंभारपाडा येथील मधुकर चंद्रया दळवी हा तरुणच पाहा. कसल्याही सोयी-सुविधा नसलेल्या पाड्यावर कुडाच्या भिंतीच्या घरात राहणारा हा कलाकार आदिवासी संस्कृतीचं कलेच्या माध्यमातून संवर्धन करत आहे. मधुकर बांबूच्या लाकडाला विविध आकार आणि रंगसंगतीच्या मिलाफातून वारली कलाप्रकारात विविध वस्तू साकारतो. त्या वारली चित्रकला आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आहेत.

 

शासनाने आर्थिक पाठबळ आणि बाजारपेठ उपलब्ध केल्यास पाड्यावरच्या कलादालनातील उद्योनमुख कलाकारांना नाव व आर्थिक पाठबळ मिळेल. पालघर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अनेक आदिवासी कलाकारांनी वारली चित्रकला डोळ्यासमोर ठेवून विविध कला प्रकारात ठसा उमटवला आहे. मात्र अंगभूत कलागुण असूनही वेळ, पैसा आणि व्यासपीठ नसल्याने अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. तलासरी या दुर्गम आदिवासी तालुक्यातील उधवा कुंभारपाडा येथील मधुकर चंद्रया दळवी या आदिवासी युवकाचे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे. तो उधवा आश्रम शाळेत सुरक्षारक्षक असून फावल्या वेळेत त्याने बांबूच्या लाकडांना विविध आकार देत, त्यावर कलाकुसर व रंगरंगोटी करून सुबक वस्तू बनविल्या आहेत.

 

आदिवासी समाजातील असल्याने वारली संस्कृती, त्यातील विविध घटना, प्रसंग, वाद्ये, प्रेरणास्थाने, व्यक्तिमत्व इ. घटकांना कलेतून मूर्तरूप दिले आहे. या संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी व कलेचा प्रचार-प्रसार व्हावा हा त्यामागचा त्याचा उद्देश आहे.
आदिवासी संस्कृतीतील तारपा, ढोल वादक, काम करण्याऱ्या स्त्रीया-पुरुष, स्थानिक संस्कृतीतील चालीरीती इ. त्याच्या कलेतील मुख्य घटक आहेत. या वस्तूंना त्यांनी थ्रीडी स्वरुपात अभिव्यक्त केल्या आहेत. स्थानिक परिसरात उपलब्ध बांबू आणि धारदार विळा, सुरी आदी साहित्याचा वापर करून घरातील एका खोलीत या वस्तू बनवतो. आज या खोलीला कलादालनाचे रूप आले असून त्याची कला पाहण्यासाठी अनेकजण भेट देतात. काही वस्तू नंदुरबार येथील संग्रहालयात पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास अंगभूत कलेचा विकास व त्यांची आर्थिक सक्षमता वाढेल. ही कुडाच्या खोलीतील कलादालने पर्यटन व्यवसायाची जोडल्यास वारली संस्कृतीचा प्रचार- प्रसार होऊन हे कलाकार नावारूपाला येतील अशी भावना शिक्षक विनेश धोडी यांनी व्यक्त केली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Art galleries on tribal padasgood newsmuktpeethobjects from bamboopreservation of tribal cultureTeacher Vinesh DhodiTribal artistsआदिवासी कलाकारआदिवासी पाड्यांवरील कलादालनआदिवासी संस्कृती जतनकुडाची घरेगौरव पाटीलचांगल्या बातम्याबांबूपासून वस्तूमुक्तपीठशिक्षक विनेश धोडी
Previous Post

राज्यात ४६ हजार ४०६, मुंबईत १३ हजार ७०२, पुण्यात ९ हजार ६४२ नवे रुग्ण! ३४ हजार ६५८ रुग्ण बरे!

Next Post

मकर संक्रांतीनिमित्त एक कोटींहून अधिक जण सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकं करणार

Next Post
Ministry of AYUSH

मकर संक्रांतीनिमित्त एक कोटींहून अधिक जण सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकं करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!