Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपाच्या दुर्लक्षामुळे वरळीत खुलेआम झाडांची कत्तल- प्रविण दरेकर

June 6, 2021
in सरकारी बातम्या
0
darekar & aditya

मुक्तपीठ टीम

पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना आणि वसुंधरा दिवसाचा मोठा कार्यक्रम पर्यावरण विभागाकडून केला जात असताना त्याच्या पूर्वसंध्येला सुमारे ४० झाडांची कत्तल राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांच्या वरळी मतदारसंघात केली गेली आहे, मुंबई मनपा आणि पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खुलेआम कत्तल करण्याची हिंमत वृक्ष शत्रू दाखवू शकले, असा घणाघाती आरोप आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मनपा, सरकार आणि अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्यावर केला.

 

काल या वृक्ष कत्तलीची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर दरेकर यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आज तातडीने घटनास्थळाला सकाळीच भेट दिली, त्यांच्यासमवेत भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे देखील होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

हे कायद्याच राज्य आहे का ?

पर्यावरण मंत्री ज्या मतदार संघाचे आमदार आहेत त्याच मतदार संघात खुलेआम झाडांची कत्तल होणे निषेधार्ह आहे. झाडं तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस अधिकारी आणि माहिती स्वतः पोलीस उपायुक्तांनी दिली. असं असेल तर हे कायद्याच राज्य आहे का, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

darekar & aditya (1)

वृक्ष प्राधिकरण आणि मनपाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करा

झाडांमुळे होर्डिंग दिसत नाहीत, झाडं होर्डिंगच्या आड येतात म्हणून या झाडांची कत्तल केली गेल्याचं अनेक राहिवाशांचं म्हणणं आहे, असं असेल ते फार गंभीर आहे. आता वातावरण संतप्त आहे म्हणून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण शांत होण्याची वाट न बघता, या पाठीमागे नेमके कोण आहेत याचा तपास करून संबंधित दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली. कारण, झाडांच्या कत्तलीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे, व्हिडीओ क्लिप देखील आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. साधार पुरावे असल्यामुळे आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकतात. एव्हढेच नाही तर वृक्ष प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण, पावसाळ्यापूर्वी सोसायट्या ट्रीमिंग साठी परवानग्या मागतात त्यावेळी त्यांच्याकडे वेळ नसतो, झाड पडून, फांद्या पडून घरांचे नुकसान होते, जीवित हानी देखील होते. या घटनेत तर खुलेआम झाडांची कत्तल केली गेली आहे, याचा अर्थ महापालिकेच्या कायद्याची भीती राहिलेली नाही आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

darekar & aditya (2)

वैयक्तिक द्वेषातून टीका नाही

आम्ही कोणतीही मागणी वैयक्तिक द्वेषातून करीत नाही, हा पर्यावरण मंत्र्यांचा मतदार संघ आहे आणि तिथेच अशा घटना घडत असतील, कुंपणचं शेत खायला लागले तर शेवटी लोकांनी कुणाकडुन अपेक्षा धरायची, हा प्रश्न आहे. एक झाड जगवायला ७ – ८ वर्षांचा काळ लागतो, एका बाजूला ऑक्सिजनची कमतरता आहे, अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी सरकार पैसे खर्च करते, सामान्य नागरिकही सहभाग देतात आणि दुसऱ्या बाजूला खुलेआम कत्तल होत असेल तर सरकारने, पोलिसांनी आणि महानगरपालिकेने याची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे, याची जाणीव करून देण्यासाठीच आज तातडीने आम्ही येथे आलो आहोत, अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

 


Tags: aditya thackeraypravin darekarप्रविण दरेकरमुंबई मनपा
Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन !: नाना पटोले

Next Post

कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Next Post
vc (1)

कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!