Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“करोना काळात पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष”: प्रविण दरेकर

May 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

राज्यातील सध्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असुन मुत्युचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची वाढणारी संख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा बघता राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती कोडमडल्यासारखी झाली आहे. त्यामुळे सरकारने ठोस पावले उचलावीत व आरोग्य यंत्रणेत सुधारणा आणावी, अशी अपेक्षा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज पालघर दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या हस्ते आज उसगाव डोंगरी येथील श्रमजीवी कोरोना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कोरोना सेंटरची पाहणीही केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चाही केली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व माजी आमदार विवेकभाऊ पंडीत, आमदार प्रसाद लाड, मनिषाताई चौधरी, जिल्हाध्यक्ष राजन नाईक, स्नेहाताई पंडीत, वसईचे तहसीलदार तसेच संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पालघर जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं. आदिवासी समाजासाठी अनेक योजना आणल्या आणि निधीही दिला. संवेदनशील असलेल्या देवेद्रजी यांनी आदिवासी समाजासाठी काम केलं. पण आज करोना काळात पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आता तरी सरकारने पालघर जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.

दरेकर म्हणाले, देवेंद्र आणि मी काल नाशिक जिल्ह्यातील कोरोना सेंटरला भेट दिली. नाशिक जिल्ह्यातील कोरोना सेंटरला भेट दिल्यावर कळले की ऑक्सीजन आणि रेमडेसिविरचा साठा मर्यादित असून त्याचा पुरवठा वाढविण्याची आवश्यकता आहे. नाशिकमधील कोरोना पॉसिटिव्ह रुग्णांचा दर ३० टक्क्यांवर गेला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारी अधिकारी यांच्यासोबत बातचित करून केंद्राशी चर्चा सुद्धा केली आहे. देशात सर्वाधिक ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाले. राज्यातील मंत्र्यानकडून आरोग्य यंत्रना कशी जलद होईल यांचा विचार केला पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितले.


Tags: devendra fadanvisMahavikas aghadipravin darekarदेवेंद्र फडणवीसनाशिकपालघरविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Previous Post

भारतरत्न लता मंगेशकरांची मुख्यमंत्री निधीस सात लाखांची मदत

Next Post

राज्यात ६३हजार नवे रुग्ण, ६१ हजार बरे! मुंबईत नवे रुग्ण ४ हजाराखाली!

Next Post
MCR 1-5-21

राज्यात ६३हजार नवे रुग्ण, ६१ हजार बरे! मुंबईत नवे रुग्ण ४ हजाराखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!