Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोकणच्या वादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत फसवी”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे टीकास्त्र

May 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

कोकणातील वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली २५२ कोटींची मदत फसवी असून यातून वादळग्रस्तांच्या पदरात काहीच पडणार नाही. कोकणवासीयांच्या संतप्त भावना शांत करण्यासाठी सरकारने मदतीचा उपचार पार पाडला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली.

 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला भाई गिरकर, निरंजन डावखरे, मच्छीमार संघटनेचे रमेश पाटील, माजी आमदार राज पुरोहित उपस्थित होते.

 

दरेकर यांनी सांगितले की , कोकणच्या वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत खूपच तोकडी आहे. नुकसानीचे प्रमाण पाहता राज्य सरकारने जाहीर केलेली मदत कोकणवासियांची क्रूर थट्टा करणारी आहे. कोकणच्या जनतेविषयी आघाडी सरकारला असणारी अनास्था या मदतीतून प्रकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत बागायतदार, मच्छीमार यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. विभागीय आयुक्तांकडून नुकसानीबाबत सादर केलेला अहवाल व मंत्र्यांकडून सांगितले गेलेले नुकसानीचे आकडे यात मोठी तफावत आहे. अशा स्थितीत वादळग्रस्तांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात शासनाकडून मदत मिळणे अशक्य आहे.

 

निसर्ग चक्रीवादळानंतर दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा अधिक भरपाई देऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. आंबा, सुपारी, नारळ बागायतदारांचे प्रत्यक्षातील नुकसान जाणून न घेताच ही मदत जाहीर केली आहे. वादळग्रस्तांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन मलमपट्टी म्हणून मदत जाहीर केली आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

राज्य शासनाने केलेली २५२ कोटींची मदतीची घोषणा कोणत्या अहवालाच्या आधारे केली हे शासनाने जाहीर करावे. मागील वर्षी निसर्ग वादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत अद्याप ५० टक्के वादळग्रस्तांना मिळालेली नाही. त्यामुळे आता जाहीर केलेली २५२ कोटींची मदत तरी तातडीने वादळग्रस्तांना वितरीत न केल्यास आपण मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करू, असेही प्रवीण दरेकर यांनी जाहीर केले.


Tags: BJPchief minister uddhav thackeraypravin darekarमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्य सरकारविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Previous Post

चंद्रपुरात दारुबंदीसाठी १४ वर्षे संघर्ष, दारुबंदी हटली १४ महिन्यांमध्ये! जाणून घ्यावं असं काही…

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शुक्रवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!