Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपाला शिकवू नका”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सचिन सावंत यांना इशारा

May 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar-sachin sawant

मुक्तपीठ टीम

मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपानेच केले. मराठा समाजाला सदैव फसविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला शिकवू नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

 

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षण आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी भाजपावर केलेल्या टीकेचा समाचार प्रवीण दरेकर यांनी घेतला.

 

त्यांनी सांगितले की, १९९९ पासून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम तुमच्या सरकारने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयातही टिकवले. आमचे सरकार होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळे करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

 

ज्यांना मराठा समाजाचे असलेले आरक्षण टिकवता आले नाही त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चंद्रकांत पाटीलांना आरक्षणाची कायदेशीर बाजू शिकवू नये. मराठा समाजाला कायदेशीर पद्धतीने आरक्षण कसे द्यायचे आणि ते कोर्टात कसे टिकवायचे आम्हाला चांगले समजते. तुम्हाला जमले तर आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा, असा टोला त्यांनी हाणला.

 

ते म्हणाले की, केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज (अलाहाबाद) येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले. काँग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला हे आधी सचिन सावंत यांनी सांगावे. कधीतरी काँग्रेसकडून आपल्याला आमदारकी मिळेल यासाठी सदैव वाट पाहत या आशेने खुळावलेल्या सचिन सावंत यांनी उगाच छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये.


Tags: BJPchandrakant patilpravin darekarsachin sawantsambhaji chhatrapatiगृहमंत्री अमित शाहछत्रपती संभाजीराजेपंतप्रधान नरेंद्र मोदीमराठा आरक्षण
Previous Post

“पिंपरी चिंचवड नवनगर सेक्टर १२ मधील लाभार्थ्यांकडे १० टक्के आगाऊ रक्कमेची सक्ती नको”

Next Post

“लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?”

Next Post
keshav upadhye

"लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!