मुक्तपीठ टीम
एकाच वेळी पाचही आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले असूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर जिल्हा दौऱ्यास शेतकरी, शिवसैनिक आणि इतरांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला. तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. आतातरी शहाणपण सुचलं, असा टोला लगावला.
असमानी संकट आल्यावर शेतकर्यास उघडे पडू न देणे हे सरकारचे कर्तव्य!- उद्धव ठाकरे
- माझ्याशी गद्दारी केली, शिवसेनेसोबत गद्दारी केली… निदान शेतकर्यासोबत तरी गद्दारी करू नका.
- हे सरकार केवळ उत्सवप्रिय आहे, भावनांचा दुष्काळ आहे.
- उत्सव साजरे करा, परंतु शेतकर्यांकडे देखील लक्ष द्या. दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे.
- ही अतिवृष्टी आहे, डोळ्यासमोर शेतकऱ्यांचं सोनं मातीमोल झालं.कुणाचं सोयाबीन, कुणाचा कापुस, कुणाचं धान्य.
- ओल्या दुष्काळाचे निकष काय? चिखलात बुचकळून दाखवायच का?
- ५०००० प्रति हेक्टर मदत ही शेतकर्यांची मागणी आहे.
- पंचनामे कधी करणार? तोपर्यंत शेतकर्यांच आयुष्य बरबाद होईल. पंचनामे होतील तेव्हा होतील.
- ओला दुष्काळ जाहीर करा, कारण भावनांचा दुष्काळ आहे, मदत तात्काळ करा ही शिवसेनेची मागणी आहे.
दरेकरांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका
उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यावरून भाजप नेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उशिरा का होत नाही पण उद्धव ठाकरे यांना शहाणपण सुचलं. ज्यावेळी हाती सत्ता होती, तेव्हा त्यांना बाहेर फिरण्यास वेळ नव्हता. त्यांना लोकांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. तेव्हा ते फक्त मातोश्रीवर बसून होते, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.