Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिपाली चव्हाणांची आत्महत्या की हत्या?

प्रवीण दरेकरांची एसआयटी चौकशीची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
darekar

मुक्तपीठ टीम

गर्भवती असलेल्या वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे सरकारने आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील तातडीने एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानअंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन क्षेत्रात कार्यरत दीपाली चव्हाण या 28 वर्षीय तरुण महिलेने आपल्या शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याच सुसाईड नोटचा, नातेवाईकांच्या आरोपांचा संदर्भ घेऊन दरेकर यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

 

मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आपल्या कामाची छाप सोडणार्‍या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. कच्या रस्त्यावरून पायी फिरायला लावणे, सुट्टी न देणे, पगार रोखून धरणे, अशा प्रकारे एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा छळ केला जात होता. ही घटना महाराष्ट्राला, राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दीपाली चव्हाण यांची हत्या झाली असल्याचाही संशय या प्रकरणात व्यक्त केला जात असल्यामुळे या प्रकरणाची शासनाने तातडीने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही तर प्रकरणातील महत्त्वाचे साक्षी, पुरावे नष्ट केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या उपवनसंरक्षक यांना तातडीने सेवेतून निलंबित करावे, संबंधित क्षेत्र संचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून त्यांना निलंबित करावे व आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून तातडीने गुन्ह्याचा तपास करावा, अशाही मागण्या दरेकर यांनी या पत्रात केल्या आहेत.


Tags: अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डीप्रविण दरेकरमेळघाट व्याघ्र प्रकल्पवन अधिकारी दिपाली चव्हाण
Previous Post

नवीन शेतकरी कायदे करून संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवा: पृथ्वीराज चव्हाण

Next Post

“मुख्य सचिवांच्या अहवालाने फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड”: नाना पटोले

Next Post
nana patole

"मुख्य सचिवांच्या अहवालाने फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!