Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ब्रुक फार्मा प्रकरणात सुरु असलेले राजकारण मुख्यमंत्र्यांनी थांबवावे”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचे आवाहन

April 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
prasad lad

मुक्तपीठ टीम

 

राज्यातील जनतेसाठी ५० हजार रेमडिसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण सुरु केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या सुरु असलेले हे बालीश राजकारण आता थांबवावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सोमवारी केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध जनतेचा जीव जात आहे, याची जाणीव सरकारने ठेवावी, असेही लाड यांनी सांगितले. मुंबई येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

लाड म्हणाले की, राज्यातील कोरोना संदर्भातील सोयी सुविधांची बिकट परिस्थिती पाहता ‘भाजपा’ ने सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य म्हणून राज्य सरकारला ५० हजार रेमडिसिवीरऔषधांचा पुरवठा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भाजपाकडून रेमडिसिवीर चा हा साठा राज्य सरकारकडे सुपूर्त केला जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. यासाठी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मी दमणला जाऊन ब्रुक फार्माच्या कंपनीला भेट देऊन त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. त्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांच्याशीही संपर्क साधून त्यांना माहिती दिली.अन्न व औषध प्रशासनाने तशी परवनागीही दिली. दमणच्या औषध प्रशासनाकडूनही परवानगी मिळाली होती. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही याची माहिती दिली होती. मात्र या उपक्रमाचे श्रेय भाजपाला मिळू नये या संकुचित वृत्तीमुळे महाविकास सरकारकडुन शेवटच्या क्षणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देऊन चौकशीसाठी बोलवले गेले.

 

लाड म्हणाले की, अलीकडेच राज्य सरकारकडून ११ कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली गेली. यामध्ये ब्रुक फार्मा या कंपनीचेसुद्धा नाव आहे. या कंपनीकडे ६० हजार औषधांच्या कुप्यांचा साठा असल्याचा आरोप पोलिसांकडून केला गेला होता. मात्र ४८ तास उलटले हा साठा कुठे आहे या प्रश्नावर मात्र हे सरकार निरूत्तर झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे किंवा थेट फडणवीस यांच्याकडुन कोणतीही माहिती न घेता, विषय जाणून न घेता थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. गृहमंत्र्यांचे हे वर्तन पूर्णत: अनपेक्षीत होते. सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही धमकीला आम्ही घाबरत नाही. जनतेच्या कल्याणासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी चालतील असे ते म्हणाले.

 

लाड म्हणाले की, राज्यात रेमडिसिवीर औषधांसाठी रूग्णांची फरफट होत आहे. सरकारने सद्यस्थितीचे भान राखावे, राजकारण बाजुला ठेवावे व जनतेच्या हितासाठी जे योग्य आहे त्यासाठी विरोधकांकडे जर चांगल्या योजना असतील तर त्याची माहिती घेऊन एकत्रितरीत्या काम करावे आणि राज्याला या संकटाला बाहेर काढावे असे ही ते म्हणाले.

 

 

 


Tags: BJPchief minister uddhav thackeraydilip walse patilNCPprasad ladShivsenaमहाविकास आघाडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

नवाब मलिकांविरोधात गुन्हा नोंदवण्याची भाजपाची मागणी

Next Post

“संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा”

Next Post
sanjay raut

"संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!