Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा समाजासाठी नोकरभरतीत १२/१३ टक्के जागा आरक्षित ठेवा – आ. प्रसाद लाड

May 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
prasad lad

मुक्तपीठ टीम

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निकाल जाहीर केला आहे. या निकालामुळे मराठा समाजामध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निकालाबाबत मराठा समाज समाधानी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट लावून धरली नाही, असा आरोप होत आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आणखी एक संधी सरकारकडे आहे, असे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवण्यात यश मिळाले होते. मात्र काही नेत्यांच्या राजकीय स्वार्थामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू व्यवस्थितपणे मांडली गेली नाही, असा आरोपही प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक असला तरी आम्ही अद्यापही आशा सोडलेली नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.

यासाठी सरकारने पुन्हा आयोगाची स्थापना करून चर्चा केली पाहिजे, असे मत आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले. न्यायालयाने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व बाबींचा पुन्हा अभ्यास करून त्यावर सरकारने चर्चा करायला हवी. नवा अहवाल तयार करायला हवा. या सगळ्या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. मात्र यातून सकारात्मक मार्ग नक्की निघेल असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

 

याशिवाय मराठा समाजासाठी नोकर भरतीत १२-१३ टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात. तर आरक्षणाच्या निर्णयानंतरच जागा भरल्या जाव्यात, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. आण्णासाहेब महामंडळ, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला मदत कशी करता येईल याबाबत ही अभ्यास केला जावा. अलौकिक कोटाचा (Supernumerary Quota) देखील विचार सरकारने करावा अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. अशी आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.


Tags: CM Udhav thackeraydevendra fadanvisMaratha Reservationprasad laadSupernumerary Quotaआमदार प्रसाद लाडउच्च न्यायालयदेवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसर्वोच्च न्यायालय
Previous Post

मुख्यमंत्री ठाकरेंचा डॉक्टरांशी संवाद…कोरोना लढ्यात फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी!

Next Post

आयएमएने केंद्र सरकारला खडसावले: “झोपेतून जागा…देशात कडक लॉकडाऊनची गरज!”

Next Post
lockdown - ima

आयएमएने केंद्र सरकारला खडसावले: "झोपेतून जागा...देशात कडक लॉकडाऊनची गरज!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!