मुक्तपीठ टीम
सध्या कोळशाच्या कमतरतेमुळे चीनमध्ये वीज संकट ओढवले आहे. त्यामुळे चीनने जगभरातून गॅस खरेदी सुरु केल्याने भारतासह अनेक देशांमध्ये गॅस महागत असतानाच आता भारतातही वीज संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि इतर सरकारी संस्थांनी दिलेल्या कोळशाच्या साठ्यांची माहिती धक्कादायक आहे. त्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. देशात वीज निर्मिती करणाऱ्या सुमारे ७२ औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये फक्त ३ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.
औष्णिक वीज केंद्रांकडे कोळसाच नाही!
- देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण विजेच्या सुमारे ६६.३५ टक्के वीज या १३५ औष्णिक वीज केंद्रांमध्ये तयार होते.
कोळशाच्या कमतरतेमुळे औष्णिक वीज निर्मिती थांबली तर उर्वरित विजेचे एकूण उत्पादन फक्त ३३ टक्के आहे.
ज्यामुळे तो वीज पुरवठाही प्रभावित होईल. - मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण १३५ पैकी सुमारे ७२ औष्णिक वीज केंद्रांकडे वीज निर्मितीसाठी फक्त तीन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.
- २ वर्षात १८ टक्क्यांनी वाढला कोळशाचा वापर
- जगभरात कोरोना महामारी सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ महिन्यात देशात सुमारे १०,६६० दशलक्ष युनिट वीज वापरली गेली.
- आता २०२१ च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ते वाढून सुमारे १४,४२० कोटी युनिट झाले आहे.
- दोन वर्षांमध्ये वीज निर्मितीसाठी कोळशाच्या वापरात सुमारे १८ टक्के वाढ झाली आहे.
कोळसा टंचाईतून उद्भवणाऱ्या परिस्थितीवर केंद्राची नजर
- केंद्र सरकारने वीज संकटावर मात करण्यासाठी कोळसा साठवणुकीचा आढावा घेण्यासाठी कोळसा मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे, जी त्यावर लक्ष ठेवून आहे.
- देशातील सुमारे ५० औष्णिक वीज केंद्रांपैकी सुमारे ४ मध्ये १० दिवस आहेत आणि सुमारे १३ थर्मल पावर केंद्रांकडे १० दिवसांपेक्षा जास्त काळ पुरेल एवढाच कोळसा शिल्लक राहिला आहे.